जाहिरात

Satara Crime: भयंकर लव्ह ट्रँगल! पती अन् प्रियकराच्या मदतीने हत्याकांड; तुकडे केले, पोत्यात भरले अन्....

अनैतिक संबंधातून मृत तरुणाचा आरोपी महिला, तिचा पती तसेच प्रियकरासोबत वाद झाला. या वादातून सतीश दडस याला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले.

Satara Crime: भयंकर लव्ह ट्रँगल! पती अन् प्रियकराच्या मदतीने हत्याकांड; तुकडे केले, पोत्यात भरले अन्....

Satara Phaltan Murder Case:  अनैतिक संबंधातून 27 वर्षाच्या तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची भयंकर घटना सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यात घडली आहे. अनैतिक संबंध, प्रेमाचा त्रिकोणी एँगल आणि त्यातून झालेल्या वादातून एका विवाहित महिलेने तिच्याच प्रियकराची पती आणि दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणले. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या... 

अनैतिक संबंधातून निर्घृण हत्या 

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात  एका 27 वर्षीय तरुणाचा थंड डोक्याने, अत्यंत अमानुष पद्धतीने खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भयंकर घटनेने सातारा जिल्हा हादरुन गेला आहे. सतीश ऊर्फ आप्पा दादासो दडस असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.  खून केल्यानंतर मृतदेहाचे  या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या महिलेसह तिचा पती लखन बुधावले आणि तिचा प्रियकर सतीश माने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Badlapur News: बदलापुरात शिवसेनेच्या नगरसेवकाला भररस्त्यात बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

मृत सतीश दडस या तरुणाचे आरोपी महिलेशी अनैतिक संबंध होते. याच महिलेचे आणखी एका तरुणाशी अफेयर होते. सतिश या महिलेला ब्लॅकमेल करत होता त्यामुळे ती महिला वैतागली होती. १४ जानेवारी, मकर संक्रांतीच्या दिवशी अनैतिक संबंधातून मृत तरुणाचा आरोपी महिला, तिचा पती तसेच प्रियकरासोबत वाद झाला. या वादातून सतीश दडस याला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले.

मृतदेहाचे तुकडे केले..

तसेच  दवाखान्यात नेतो असा बनाव करत त्याला विडणीच्या मांगोबा माळ परिसरात नेण्यात आले. तिथे त्याचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. इतकेच नव्हेतर लाकूड कापण्याच्या कटरने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. तुकडे करण्यात आलेले शरीर पोत्यात भरुन एक पोते शेततळ्यात टाकण्यात आले तर दुसरं पोते थेट नीरा नदीत फेकून देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वरळी हादरली! पोलिसाच्याच 5 वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, आरोपीने गल्लीबोळातून मुलाला समुद्राकडे नेले अन्..

२१ जानेवारी रोजी मृताच्या भावाने दिलेल्या बेपत्ता तक्रारीनंतर पोलिस तपासाला वेग आला.  तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास करत फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या तिघांच्या मुसक्या आवळल्या. सुरुवातीला त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.  अनैतिक संबंध, विश्वासघात आणि क्रौर या तिन्हींचं भीषण मिश्रण असलेला हा खून सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com