Vasai Virar : रुग्णांच्या आरोग्याची खेळ, वसई विरार पालिकेच्या रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा

बनावट औषधांचा मोठा स्कॅम उघड झाला असून वालीव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 4 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी

वसई विरार (Vasai Virar News) शहर पालिकेच्या आरोग्य विभागाला बनावट औषधांचा पुरवठा होत (fake medicines to the municipal health department) असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या सातिवली येथील माता बाळ संगोपन रुग्णालयातील औषधांची तपासणी केली असता बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा होत असल्याचे उघड झालं आहे.

बनावट औषधांच्या पुरवठ्याचा एक मोठा घोटाळा असून यामध्ये आंतरराज्यातील रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता FDA ने व्यक्त केली असून या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात बहुजन विकास आघाडीचा मेडिकल विभाग पालघर जिल्हा सचिव अनिस शेख याच्यासह एकूण सहा पालिकेला औषध गोळ्या पुरवठा करणाऱ्या कंपनी आणि त्यांच्या मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बनावट औषध गोळ्या पुरवठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजय शैलेंद्र चौधरी हा दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये सध्या नागपूरच्या तुरुंगात असूनही तो हे रॅकेट चालवतो. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बनावट औषधं पुरवणाऱ्या कंपन्यानविरोधात कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील यांनी केली असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Kalyan : APMC निवडणुकीपूर्वी राडा ! महायुतीच्या उमेदवाराकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मारहाण

पालघरच्या अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांनी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात एक भयंकर मोठा मेडिकल स्कॅम उघडकीस आला आहे. या औषध घोटाळ्याची पाळेमुळे देशभर पसरली असल्याची भीती या प्रकरणातून व्यक्त केली जात आहे. वसई विरार शहर महानगर पालिकेच्या सातिवली येथील माता बाळ संगोपन रुग्णालयातील औषधांची तपासणीवेळी येथील काही औषधं बनावट असल्याचे उघड झालं.  महत्वाचे म्हणजे ही औषधं पुरवठा करण्याचे कंत्राट हे अनिस अश्रफ शेख (सक्षम व जबाबदार व्यक्ती) मे. प्रणीक एन्टरप्राईजेस याचे असून तो, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा पदाधिकारी आणि पालघर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. सध्या दुबईत असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

 नागपूरच्या जेलमधून मास्टर माईंड विजय शैलेंद्र चौधरी चालवतोय बनावट औषधांचे रॅकेट

अन्न व औषध प्रशासनाच्या तपासात कंत्राटदार मे. प्रणीक एन्टरप्राईजेसच्या अनिस शेख याने वसई पश्चिमेच्या मे. अमर एजन्सीकडून औषधांची खरेदी केली होती, तर अमर एजन्सीला वसई पूर्वच्या सातिवली येथील श्याम फार्मा द्वारे पुरवठा झाला आहे. तर, शाम फार्माला बाजूलाच असलेल्या गणेश फार्मा ॲण्ड सर्जिकल एलएलपीकडून पुरवठा झाला होता. तर गणेश फार्मा ला, भिवंडीच्या में अॅक्टीवेन्टीज बायोटेक प्रा.ली. ने पुरवठा केलाय. तर, अॅक्टीवेन्टीज बायोटेकला पुरवठा केला आहे. तो मुख्य मास्टर माईंड विजय शैलेद्र चौधरी याच्या मीरा रोड येथील मे. कॅबीज जनरीक हाउसकडून. विशेष म्हणजे या बनावट औषध गोळ्या पुरवठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजय शैलेंद्र चौधरी हा अशाच दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये सध्या नागपूरच्या तुरुंगात असूनही तो हे रॅकेट चालवतो.

Advertisement

नक्की वाचा - Crime News : भूत उतरवण्याचा नावाखाली अडीच वर्षाच्या मुलाला चटके देत वेताच्या छडीने मारहाण, मुंबईतील धक्कादायक प्रकार

अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून होतोय वसई विरार महापालिकेला बोगस औषध पुरवठा...

याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे विजय चौधरी याची मीरा रोड येथील मे. कॅबीज जनरीक हाउस ही कंपनी अस्तित्वात नसल्याचे आणि सदर कंपनीचे परवाने रद्द केल्याबाबतची माहिती सहायक आयुक्त (औषधे), ठाणे परिमंडळ 02 यांनी सादर केली आहे. त्यामुळे जी कंपनी अस्तित्वात नाही तिच्या नावाने होणारा हा बोगस औषध पुरोठा, याची निर्मिती कोण करतोय याचे कोडं अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पडलंय. आणि अशा बोगस पुरवठादरांकडून वसई विरार शहर महानगरपालिका औषधांची खरेदी करतंय. हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

बनावट औषधाचे पुरवठादार आणि विक्रेते यांनी संगनमताने वरील बनावट औषध याची  खरेदी आणि विक्री केली आहे. त्यामुळे बनावट औषधाचे सेवन केल्याने मानवी आरोग्यास धोका होऊ शकतो. तसेच सदरचे औषध बनावट असून खरे औषध म्हणून जनतेची आणि रुग्णाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी औषधाची निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्य असून, या औषधाची निर्मिती कोठे झाली व त्यासाठी लागणारा कच्चामाल, पॅकींग मटेरीअल इत्यादी साहित्य कोठून आणले आणि कोठे-कोठे विक्री केले याबाबतचा तपास करणे आवश्यक आहे. सदर बनावट औषधाची खरेदी विक्री नफा खोरी साठी केली आहे. सदर प्रकरणाचा गुन्हा हा समाजविघातक प्रवृत्तीमध्ये मोडतो व मोठ्या प्रमाणावर जनतेचा आरोग्यास हानी पोहचवतो. म्हणून या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात भा. न्या. सं. कलम 318 (4), 336(3), 340(2), 278, 3 ( 5 ) सह औषधी द्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियम 1940 चा कलम17(B) चा भंग केला असल्याने खालील व्यक्ती व संस्था विरुध्द सरकारतर्फे औषध निरिकक्ष सतीश चव्हाण यांनी कायदेशीर तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.


गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं

1. अनिस अश्रफ शेख (सक्षम व जबाबदार व्यक्ती) मे. प्रणीक एन्टरप्राईजेस, नालासोपारा पश्चिम. 

2. वरूण नितीन मोदी व श्री. नितीन ताराचंद मोदी (सक्षम व जबाबदार व्यक्ती) वसई पश्चिम.

3. श्रवण पुखराजजी दाबी (सक्षम व जबाबदार व्यक्ती) मे. श्री श्याम फार्मा, सातिवली, वसई पूर्व.

4. मयंक हरखानी (सक्षम व जबाबदार व्यक्ती) मे. श्री गणेश फार्मा ॲण्ड सर्जिकल एल एल
पी, सातिवली, वसई पूर्व.

5. मिहिर त्रिवेदी, संचालक, में अॅक्टीवेन्टीज बायोटेक प्रा.ली. नारकोली, भिवंडी.

6. विजय शैलेद्र चौधरी (मालक) मे. कॅबीज जनरीक हाउस, मिरा रोड (सध्या नागपूर तुरुंगात )

Topics mentioned in this article