
26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याला अमेरिकेतून भारतात आणलं गेलं. त्याला भारतात आणल्यानंतर NIA नं ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला ताब्यात घेतानाचा एक फोटो समोर आला आहे. शिवाय तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोत त्याचा चेहरा दिसत नाही पण त्याची शरीरयष्टी पहिल्या पेक्षा वेगळी दिसत आहे. त्याने अंगात चॉकलेची रंगाचा जंपसूट घातला आहे. त्यावरून जंपसूटवर राणाला अमेरिकेतून कसे काय आणले गेले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण त्या मागे ही एक मोठं कारण आहे. तेच आपण जाणून घेणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तसं पाहीलं तर पँट शर्ट, टीशर्ट, कुर्ता पायजमा या कपड्यात अनेक वेळा आरोपींना आणताना आपण पाहीलं आहे. पण तहव्वुर राणा याला जंपसूटवरच का आणलं गेलं हा खरा प्रश्न आहे. याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. त्यामागे ही एक कारण आहे. चॉकलेची रंगाचा हा जंपसूट राणाने आपल्या मर्जीने घातला नव्हता. तर तो अमेरिकेतील काही खास कैद्याचा गणवेश आहे. काही विशेष परिस्थितीत हा गणवेश कैद्यांना घालण्यासाठी दिला जातो.

ज्या कैदी हायप्रोफाईल आणि हाय रिस्कचे असतात त्यांना असा गणवेश अमेरिकेत दिला जातो. त्यामुळे त्यांची वेगळी ओळख दिसून येते. या सूट मागे आणखी एक कारण ही आहे. हा रंग मानसीक खच्चीकरण ही करतो असं अमेरिकेत मानले जाते. त्यातून कैद्यांच्या मनात आत्मचिंतन करण्याची भावना ही निर्माण होत असते. या भावनेतूनही या कैद्यांना अशा प्रकारचा गणवेश दिला जातो. या आधी कैद्यांना ऑरेंज रंगाचा ड्रेस दिला जात होता.

अमेरिकेत वेळो-वेळी कैद्यांचे ड्रेस बदलले आहेत. अमेरिकेत कैद्यांना दिलेला गणवेश हा फक्त ड्रेस नाही तर त्या मागे एक प्रक्रियेचा भाग ही आहे. त्यामुळे वेळोवेळी या कपड्यांचा रंगही बदला गेला आहे. पूर्वी काळी आणि सफेद पट्टी असलेला युनिफॉर्म कैद्यांना दिली जात होता. त्यानंतर चमकता ऑरेंज रंगाचा युनिफॉर्म आला. त्यानंतर गुलाबी आणि आता ब्राऊन रंगाचा जंपसूट आला आहे. त्यामुळे राणाने घातलेले कपडे हा काही फॅशनचा भाग नाही. उलट तो सुरक्षेच्या दृष्टीने उचलेलं पाऊल आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world