जाहिरात

Railway News : बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार; रेल्वेच्या नव्या मार्गाला मंजुरी

New Railway Badlapur To Navi Mumbai : रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. 

Railway News : बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार; रेल्वेच्या नव्या मार्गाला मंजुरी

निनाद करमरकर, बदलापूर

Badlapur News : मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान लवकरच 'पुढील स्टेशन - कासगाव' अशी उद्घोषणा ऐकू येणार आहे. कारण कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास मंजूरी देत रेल्वेकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे बदलापूरकरांना नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत पोहोचणं शक्य होणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बदलापूर शहरातून दररोज हजारो प्रवासी नवी मुंबईला नोकरी-धंद्यानिमित्त ये-जा करतात. या प्रवाशांना रेल्वेनं जायचं झाल्यास ठाण्यावरून लोकल बदलून जावं लागतं. तर रस्तेमार्गानं NMMT च्या निवडक बस सेवा उपलब्ध असून शिळफाटा किंवा तळोज्याच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत त्यांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी सध्या दीड तासांचा वेळ लागतो. 

(नक्की वाचा- एस्केलेटरवरून पडून वृद्धाचा मृत्यू, पुणे रेल्वे स्थानकातील घटना)

पण कासगावपासून नवी मुंबईला जोडणारा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. 

(नक्की वाचा- "परतफेड करेन तेव्हा डिलिट करणार", नितशे राणेंना 'तो' व्हिडीओ आजही मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय)

यानंतर रेल्वेनं या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच 'पुढील स्टेशन - कासगाव' ही उद्घोषणा लोकलमध्ये ऐकू येणार आहे. तसेच बदलापूरकरांचा त्रास काहीसा कमी होणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: