सांगलीतील 'आदर्श' तलाठ्याचा कारनामा; सातबारा उताऱ्यामुळे फुटलं बिंग 

वैभव तराळेकर 2024 मध्ये आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर कडेगाव तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min
सांगली:

आदर्श पुरस्काराने गौरव करण्यात (Honored with Adarsh ​​Award) आलेल्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तलाठ्याचं नाव वैभव तारळेकर असून ते कडेगाव तालुक्यातील तडसर येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. ज्या तलाठ्याला चांगल्या कामासाठी गौरविण्यात आलं, आणि आदर्श पुरस्कार देण्यात आला त्याला दहा हजार रूपयांची लाच घेताना अधिकाऱ्यांनी रंगहाथ पकडलं आहे.

आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त तलाठ्याला लाच 10 हजारांची लाच घेताना सांगलीच्या कडेगावमध्ये रंगेहात पकडण्यात आलं आहे. वैभव तारळेकर असं या तलाठ्याचं नाव असून तो कडेगाव तालुक्यातील तडसर येथे तलाठी म्हणून कार्यरत होता. शेत जमिनीची नोंद घालून सातबारा उतारा देण्यासाठी शेतकऱ्याकडे तलाठी तारळेकर यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती आणि ही लाच घेताना कराडकर यांच्या घराजवळच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडलं आहे.

नक्की वाचा - NDTVच्या बातमीची दखल, 'त्या' धोकादायक व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल; अज्ञात तरुण-तरुणीचा शोध सुरू

वैभव तराळेकर 2024 मध्ये आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर कडेगाव तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील आहेत. आदर्श तलाठीकडूनच लाच घेतल्याच्या या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे.
 

Topics mentioned in this article