रील बनवण्याच्या नादात अनेकजण जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार घडत असतात. असाच एक प्रकार कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाजवळ घडला. येथील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका बंद इमारतीच्या छतावरून तरुण-तरुणीने धोकादायकरित्या रिल बनवले होते. हे रील एनडीटीव्हीने प्रसारित केले होते.
या व्हिडिओत एका बंद पडलेल्या इमारतीच्या छतावर तरुण झोपला असून त्याच्या हाताला धरून तरुणी खाली लटकताना दिसत आहे. खाली पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गही दिसत आहे. या तरुणीने हाताशिवाय कशाचाच आधार घेतलेला दिसत नाही. मागील काही दिवसांत हा रील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पुणे-बंगळुरू महामार्गाजवळील एका पडीक इमारतीवरून चित्रीत करण्यात आला आहे. या इमारतीवर चढून तरुण आणि तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत. ग्रीप स्ट्रेंथ चेक म्हणजेच हाताची पकड किती घट्ट आहे, हे तपासण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याचे लिहून हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. दोन ते तीन मजली उंच इमारतीएवढ्या उंचीवरून तरुणी या तरुणाचा हात पकडून अधांतरी लटकत असल्याचे दिसत आहे. हा परिसर स्वामी नारायण मंदिराजवळ आहे.
स्टंटबाजी करणाऱ्यांबरोबर त्यांचा हा स्टंट चित्रीत करणारे तरुण देखील व्हिडिओत दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवरून संबंधित तरुण-तरुणीवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील सुलीभंजन दत्त मंदिराजवळ ही घटना घडली आहे. श्वेता दिपक सुरवसे (23 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्नेता व तिचा मित्र शिवराज मुळे (वय 25 वर्ष) हे छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या कारने सोमवारी सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले होते. मंदिराचा परिसर विहंगम असून पावसाळ्यात निसर्गाचं सौंदर्य अधिक खुलत. यावेळी त्यांनी तिथे रील्स शूट करण्याचं ठरवलं.
नक्की वाचा - VIDEO : रीलच्या नादात कार दरीत कोसळली; 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू
मोबाइलवर रील्स बनवताना श्वेताने कार चालवण्यासाठी घेतली. कार चालवताना रिव्हर्स गिअर पडून अॅक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन खाली कोसळली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर कार दरीत कोसळल्यानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world