- संगारेड्डी येथे पाच महिन्यांच्या गर्भवती सुष्मिताने पती आणि सासूच्या संशयामुळे आत्महत्या केली आहे
- सुष्मिताचा पती गर्भातील बाळाची DNA चाचणी करण्याची मागणी करत होता
- घरगुती हिंसाचार आणि छळामुळे मुलीचा मृत्यू झाला असल्याचा सुष्मिताच्या आईचा आरोप
Telangana Sushmitha Case: तेलंगणामधील संगारेड्डी येथे एका गरोदर महिलेने पती आणि सासूच्या संशयाला कंटाळून आपले जीवन संपवले. पाच महिन्यांच्या गरोदर असलेल्या या महिलेच्या पोटातील बाळाची डीएनए चाचणी करण्याची मागणी तिचा पती आणि सासू करत होते. पोटातील बाळ दुसऱ्या कोणाचे तरी असल्याचा संशय त्या दोघांना होता आणि म्हणूनच डीएनए चाचणी झाली पाहिजे, अशी मागणी ते सुष्मिताकडे करत होते. अखेर संशयाच्या सावटाखाली जगण्यापेक्षा या महिलेने मृत्यूला जवळ करणे योग्य समजले आणि हे टोकाचे पाऊल उचलले. सुष्मिता असे मृत महिलेचे नाव असून 18 महिन्यांपूर्वीच तिचा जी. अभिलाष नावाच्या व्यक्तीशी लग्न झाले होते.
पतीच्या संशयामुळे गेला महिलेचा जीव
सुष्मिताची आई जनाबाई यांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीच्या पतीला आणि सासूला सुष्मिताचे अन्य कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय होता. याशिवाय त्यांची मुलगी घरगुती हिंसाचाराचा सामना करत होती आणि अनेकदा तिच्यासोबत गैरवर्तन केले जात होते. जनाबाई यांनी सांगितले की, "मी 23 जून रोजीच माझ्या मुलीच्या घरी गेले होते आणि डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाबद्दल बोलले होते. या दरम्यानही त्यांच्यात वाद सुरू झाला होता." सुष्मिताच्या आईने सांगितले की, त्यांच्या जावयाला गर्भातील बाळाची डीएनए चाचणी करायची होती.
(नक्की वाचा : Ketan Agrawal Case: केतन दरीत रक्ताच्या थारोळ्यात, सियाने 15 मिनिटं केली ही गोष्ट अन् पहिला कॉल 'या' व्यक्तीला)
तेलंगणा पोलिसांनी पतीला केली अटक
जनाबाई यांनी पुढे सांगितले की, दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठांनी समजूत काढल्यानंतर त्या वेळी प्रकरण शांत झाले होते. तरीही तिचा छळ सुरूच राहिला. अखेर सुष्मिताने गळफास लावून घेतला. आता जनाबाई यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून तिचा पती जी. अभिलाष आणि सासूला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करणे, क्रूरता आणि घरगुती हिंसाचार अशा आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.
(नक्की वाचा : Pimpri Chinchwad News: आईला कामावरून काढल्याचा राग! कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अपहरण करून मारहाण)
18 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
दोघांचे लग्न 18 महिन्यांपूर्वीच झाले होते. सुष्मिता पाच महिन्यांची गरोदर होती. पण तिचा पती तिला सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता, ज्यानंतर तिने हे पाऊल उचलले. अल्लादुर्ग पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांनी सांगितले की, अभिलाष आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world