जाहिरात

Ketan Agrawal Case: केतन दरीत रक्ताच्या थारोळ्यात, सियाने 15 मिनिटं केली ही गोष्ट अन् पहिला कॉल 'या' व्यक्तीला

Ketan Agrawal Case: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

Ketan Agrawal Case: केतन दरीत रक्ताच्या थारोळ्यात, सियाने 15 मिनिटं केली ही गोष्ट अन् पहिला कॉल 'या' व्यक्तीला
"Ketan Agrawal Case: केतन अग्रवालला दरीत ढकल्यानंतर सिया गोयलने पहिला कॉल या व्यक्तीला केला"
PTI

Ketan Agrawal Case:  पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि अंगावर काटा आणणारे खुलासे समोर येत आहेत. केतनला दरीत ढकलल्यानंतर सियाने जे वर्तन केले, ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. तपासातील माहितीनुसार, चेतन चौधरीने केतनला लोहगडाच्या कड्यावरून खाली ढकलल्यानंतर सियाने कोणताही आरडाओरडा केला नाही. उलट ती दोन मिनिटे पूर्णपणे शांत उभी होती.

त्यानंतरही गंभीर जखमी झालेल्या केतनला वाचवण्यासाठी तिने स्थानिक नागरिक किंवा पोलिसांकडे तातडीने मदत मागितली नाही. धक्कादायक बाब म्हणजे तिने सर्वात आधी स्वतःच्या आईला फोन लावला आणि केतन किल्ल्यावरून खाली पडल्याची माहिती दिली. या संपूर्ण प्रकारात तिने तब्बल 15 मिनिटे वाया घालवली. यामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या केतनला वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही आणि त्याचा जीव गेला.

पोलिसांनी क्राइम सीन केला रीक्रिएट

पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येची आरोपी सिया गोयल हिला पोलीस रविवारी (28 जून) लोहगडावर घेऊन गेले होते, जिथे एका पुतळ्याचा (डमी) मदतीने घटनास्थळावरील क्राइम सीन रीक्रिएशन करण्यात आला.  

पोलिसांच्या मते या प्रक्रियेचा उद्देश 18 जून रोजी नेमकं काय घडलं, याचा अचूक माग काढणे हा आहे. 20 वर्षीय सिया गोयल आणि चेतन चौधरीने (वर्ष 22) 25 वर्षीय अग्रवालला किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.

(नक्की वाचा : Ketan Agrawal Case: गुगलवर शोधला हत्येचा प्लॅन अन् किल्ल्यावर केली प्रॅक्टिस, केतन हत्याकांडचा 'हा' खुलासा वाचून अंगावर काटा येईल)

पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,"रविवारी सकाळी घटनास्थळावर  क्राइम सीन रीक्रिएट करण्यात आला. आरोपीला त्या प्रत्यक्ष ठिकाणी नेण्यात आले होते, जिथे ही घटना घडली होती.

पोलिसांनी एक पुतळा तयार केला आणि सिया गोयलला हे दाखवण्यास सांगितले की तिने केतनला त्या ठिकाणाहून कसे ढकलले होते. गोयलने गुन्ह्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वापरलेला रस्ताही पोलिसांना दाखवला. चेतन चौधरीलाही अशाच प्रकारे क्राइम सीन रीक्रिएशन करण्यासाठी स्वतंत्रपणे किल्ल्यावर नेण्यात येईल.

(नक्की वाचा : Pune News: "केतनच्या हत्येच्या दिवशी काही लोक लोहगडावर..", या प्रकरणाचा फासा पलटणार? विशाल अग्रवाल म्हणाले..)

सिया गोयलने केतन अग्रवालची का केली हत्या?

केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचल्याच्या आणि लोहगडावरून ढकलून दिल्याच्या आरोपाखाली सिया गोयल आणि चेतन चौधरीला अटक करण्यात आली आहे. सिया गोयलने पोलिसांना कथितरीत्या सांगितले की, तिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचे नव्हते आणि लग्न मोडल्यास कुटुंबाची बदनामी होईल असे तिला वाटले, म्हणूनच तिने चौधरीसोबत मिळून अग्रवालच्या हत्येचा कट रचला.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com