Crime News : एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी एका २४ वर्षीय तरुणाला अटक केलं. त्याच्याविरोधात जे आरोप समोर आले आहेत, ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या तरुणाचं लग्न ठरलं होतं. लग्नापूर्वी मुलीच्या कुटुंबाकडून नवरामुलाच्या रक्ततपासणीची मागणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं उघड झालं. यानंतर मुलीला मिळविण्यासाठी तरुणाने जे पाऊल उचललं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.
लग्नाची सुरू होती तयारी...
नवऱ्या मुलीच्या कुटुंबीयांनी नवऱ्या मुलाची एचआयव्ही तपासणी करण्याची मागणी केली होती. नवऱ्यामुलाचे आई-वडील दोघेही एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र नवरा मुलगादेखील एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर वडिलांनी आपली मुलगी देण्यास नकार दिला. यानंतर नवरा मुलगा प्रचंड संतापला. त्याला त्याच मुलीशी लग्न करायचं होतं. यासाठी त्याने अत्यंत संतापजनक पाऊल उचललं.
नवरी मुलीला दिलं एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन..
नवऱ्या मुलाला त्याच मुलीसोबत लग्न करायची तीव्र इच्छा होती. यासाठी त्याने अत्यंत संतापजनक कृत्य केलं. या तरुणाने संधी साधत २२ वर्षांच्या तरुणीला एचआयव्ही संक्रमित रक्ताचं इंजेक्शन टोचलं. मुलगीही एचआयव्ही संक्रमित झाली तर ती त्याच्याशी लग्न करेल आणि कायमची त्याच्यासोबत राहील या विचाराने नवऱ्या मुलाने हे संतापजनक कृ्त्य केलं. तेलंगणातून हा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दुसरीकडे तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world