पुण्यात गेल्या काही वर्षांपासून कोयता गँगची दहशत पाहायला मिळते. रात्रीच्या वेळी कोयता घेऊन फिरणे, गाड्या फोडणे, दुकानदारांना धमकावण्या सारखे कृत्य आतापर्यंत करीत असलेल्या या तरुणांनी आता गुन्हेगारीची परिसीमा गाठली आहे.
नक्की वाचा - Pune Crime : पुण्याच्या IT कंपनीत तरुणीची हत्या, सहकाऱ्याने पार्किंगमध्ये गाठलं अन्...
पुण्यातील बिबेवाडी परिसरात या कोयता गँगने एका तरुणाच्या हाताचा पंजा कोयत्याने तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी परिसरात या गँगने कोयत्याने दोन जणांवर जीवघेणा हल्ला केला. आणि यात तरुणावर पंजा गमावण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात पीयूष पाचकुडवे हा तरुण या गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणात सागर सरोज आणि त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन तरुणासह दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
Kolhapur Crime : मामाकडून भाचीचं लग्न उद्ध्वस्त करण्याचा घाट, जेवणात घातलं विष; कारण ऐकून पाहुण्यांचा संताप!
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता घडला. फिर्यादी आणि त्याचा मित्र पीयूष यांना आरोपींनी भेटायला बोलावलं होतं. पूर्वी त्यांच्यात काही कारणांवरुन वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये पीयूष याच्या हातावर आरोपींनी कोयता मारला. ज्यामध्ये त्याचा हाताचा पंजा खाली पडला आणि पीयूष गंभीर जखमी झाला. इतकंच नाही तर पीयूषच्या हातावर आणि मांडीवर सुद्धा आरोपींनी कोयत्याने वार केले. घटनेनंतर दोघा जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले गेले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पीयूष याचा हाताचा पंजा जोडायचा प्रयत्न सुद्धा केला आहे. दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.