Thane News : ठाणे पालिकेतील लाचखोर अधिकाऱ्यावर फुलांचा वर्षाव, नेमकं काय घडलं? 

25 लाखांची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यावर फुलं उधळण्यात आली. नेमकं काय घडलं?

जाहिरात
Read Time: 2 mins

Thane Corporation official arrested in bribe : ठाण्यातील महापालिकेच्या अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका खाजगी बिल्डरला अतिक्रमण हटवण्यासाठी 35 लाख रुपयांची लाच ठाणे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांनी मागितली होती. बिल्डरने अगोदरच दहा लाख रुपये शंकर पाटोळे यांना दिले होते आणि  25 लाख रुपये उर्वरित देण्याकरिता बिल्डर शंकर पाटोळे यांच्या ठाणे महापालिकेचे केबिनमध्ये गेले असताना अँटी करप्शन ब्युरोंने धाड टाकून शंकर पाटोळे यांना रंगेहात लाच घेताना अटक केली. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यावर फुलं उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. 

शंकर पाटोळे यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी 50 लाख रुपयाची लाज ठाण्यातील बिल्डराकडे मागितली होती. साडेसहा तास चौकशीनंतर मुंबई अँटी करप्शन ब्युरोने शंकर पाटोळे यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने केल्या अनेक दिवसांपासून ठाण्यामध्ये अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली जात आहे. मात्र अनधिकृत बांधकामाला अभय देणारे हेच अधिकारी आहेत. 

नक्की वाचा - Shocking: 'स्वीटी बेबी डॉल' बोलून चैतन्यानंद बाबा करत होता मुलींचा सौदा; व्हॉट्सॲप चॅटने उघड झाला 'डर्टी' खेळ

अधिकाऱ्यावर उधळली फुलं...
25 लाख लाच घेणारे ठाणे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर फुलं उधळण्यात आली. ⁠अधिकाऱ्याचा निषेध फुलं उधळून करण्यात आली आहे. ⁠ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंध कारवाई दरम्यान सामाजिक कार्यकर्त्याने फुलं उधळली. ⁠ठाणे मनपा उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून ⁠अटक करुन नेत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शंकर पाटोळे यांचा निषेध करत त्यांच्यावर फुलं उधळली. ⁠शंकर पाटोळे ठाणे मनपाचे उपायुक्त असून ⁠बिल्डरकडून 25 लाख रुपये लाच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. ⁠मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना  अटक केली असून ⁠शंकर पाटोळे यांच्या सह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.