जाहिरात

Viral Video: स्कुटीने कट मारला, बस चालक भडकला, जोरदार राडा, टीएमटी चालकाला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण

व्हिडीओत स्पष्ट पणे दिसत आहे की एक तरुणी हातात दांडका घेवून बसमध्ये चढला. त्याने थेट चालक चव्हाण यांच्यावर हल्ला केला.

Viral Video: स्कुटीने कट मारला, बस चालक भडकला, जोरदार राडा, टीएमटी चालकाला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण
  • ठाणे कोपरी बस डेपोमध्ये TMT बस चालक शंकर गजानन चव्हाण यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आली
  • चालक व स्कुटीस्वार यांच्यात शाब्दिक वादानंतर आरोपी निलेश शिंदे यांने साथीदारांना बोलावून बसवर हल्ला केला
  • बसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींच्या हल्ला स्पष्ट दिसत आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
ठाणे:

रस्त्यावर बसला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठा वाद झाला. या  वादातून ठाणे परिवहन सेवेच्या (TMT) एका चालकावर 7 ते 8 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. ही धक्कादायक घटना कोपरी बस डेपोमध्ये घडली. या हल्ल्यात बस चालक शंकर गजानन चव्हाण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील कोपरी बस डेपोत गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रक्ताचा थरार पाहायला मिळाला. प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये घुसून काही तरुणांनी चालक शंकर चव्हाण यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. "ड्रायव्हरला मारून टाका," असे ओरडत एका महिलेनेही जमावाला चिथावणी दिल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

मिरा भाईंदर ते ठाणे या मार्गावर धावणाऱ्या MH 04 LY 6993 या बसला गायमुख परिसरात एका स्कुटीस्वाराने (MH 04 LC 1214) कट मारला. यावेळी चालक चव्हाण आणि स्कुटीस्वार निलेश शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर चालक  चव्हाण यांनी  त्या तरूणाची माफी मागितली. त्यानंतर बस पुढे नेली. मात्र माफी मागूनही निलेश शिंदे याने आपल्या साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. बस कोपरी डेपोत पोहोचताच, आधीच दबा धरून बसलेल्या 5 ते 6 तरुणांनी आणि एका महिलेने बसमध्ये घुसून लाकडी दांडक्याने चालकाला बेदम मारहाण केली.

नक्की वाचा - Shaktipeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलला, नवा आराखडा समोर, आता 'या' भागातून जाणार रस्ता

व्हिडीओत स्पष्ट पणे दिसत आहे की एक तरुणी हातात दांडका घेवून बसमध्ये चढला. त्याने थेट चालक चव्हाण यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणा पाठोपाठ आणखी काही तरूण बसमध्ये घुसले. त्यानंतर ते चालकाला ओढू लागले. त्यांनी त्याला तिथेच जबर मारहाण केली. त्यांचे कपडे फाडले. त्यांना गाडी बाहेर ओढून काढले. त्यानंतर सर्वांनी मिळून जबर मारहाण केली. चालक चव्हाण यांना इतकी मारहाण केली की ते बेशूद्ध झाले. त्यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र कोणी ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. सर्व जण हा तमाशा बघत राहीले. 

नक्की वाचा - CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता पूर्णपणे 'हायटेक'! जुनी अर्ज पद्धत बंद, एका क्लिकवर मिळणार निधी

हल्लेखोरांनी केवळ चालकालाच नव्हे, तर बसमधील वाहकालाही मारहाण केली आहे. शिवाय त्यांच्या हातात असलेलं तिकीट बुकिंग मशिनची तोडफोड केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी निलेश शिंदे याने स्वतःचा बचाव करण्यासाठी कासारवडवली पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध आधीच तक्रार दाखल केली होती. मात्र, बसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला असून कोपरी पोलिसांनी आता याप्रकरणी खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपी हे सध्या फरार आहेत. त्यांचा तपास पोलीस करत आहे. या घटनेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com