पैशासाठी मूर्तीकार बनला चोर, कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक

महिला प्रवाशाचे गळ्यातील महागडी चैन हिसकावून एका चोरट्याने पळ काढला. सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान

वासिंद रेल्वे स्थानकात लोकल थांबली असता एका महिला प्रवाशाचे गळ्यातील महागडी चैन हिसकावून एका चोरट्याने पळ काढला. सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे. दिनेश धुमाळ असे या चोरट्याचे नाव आहे.  तो टिटवाळ्याला राहतो. दिनेश हा मूर्तीकार आहे. त्याच्या विरोधात यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंधरा दिवसापूर्वी लोकलच्या महिला डब्यात काही महिला प्रवासी प्रवास करीत होत्या. वासिंद रेल्वे स्थानकात लोकल थांबली. लोकल सुरु होताच लोकलच्या दारात उभा असलेला एक तरुण, एका महिलेची चैन हिसकावून फलाटावर उतरला आणि पळून गेला. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही लागले होते. त्यात चोरटा पळताना दिसत होता. पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरु केला. अखेर  पंधरा दिवसानंतर या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. 

हेही वाचा - पतीच्या प्राध्यापक मित्रानेच केला घात; पेढा खाऊ घालून गाठली अत्याचाराची परिसीमा

दिनेश धुमाळ असे या चोरट्याचे नाव आहे. तो टिटवाळ्याला राहतो. दिनेश हा मूर्तीकार आहे. त्याला पैशाची गरज होती. त्याने महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पळ काढला होता. या बाबत कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले की दिनेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. दिनेश याने अटक होण्यापूर्वी चोरीच्या घटना केल्या आहेत का याचा तपास सुरु आहे.

Advertisement