मित्राबरोबर घाटात फिरायला गेली अन् घात झाला, पुण्यात 21 वर्षीय तरुणी बरोबर भयंकर घडलं

पुण्यात गेल्या काही दिवसापासून महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत असताना दिसत आहे. गुरूवारी रात्री 11 च्या सुमारास बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरुणीवर गँग रेप झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती तिच्या मित्रा सोबत बोपदेव घाटात गेले होती. त्याच वेळी तिथे 3 अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी या दोघांनाही दमदाटी केली. त्यानंतर तिघांनीहा आळीपाळीने त्या तरूणीवर गँग रेप केला. त्यानंतर ते सर्व जण तिथून फरार झाले आहेत.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

या घटने नंतर ती आणि तिचा मित्र हादरून गेले. त्यांनी तातडीने कोंढवा पोलिस स्टेशन गाठले. त्यांच्या बरोबर झालेल्या घटनेची हकीगत सांगितली. पोलिसांनीही तातडीने आरोपीचा शोध घेण्यासाठी पावलं उचलली. पुणे क्राईम ब्रँचने 10  पथके तयार केली आहेत. त्यातून ते या आरोपींचा शोध घेत आहेत. त्या तरूणीने ज्या लोकांनी अत्याचार केला आहे त्यांचा पेहराव सांगितला आहे. त्यानुसार पोलिस शोध घेत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग, विनयभंग अन् पुढे...

ही 21 वर्षीय तरूणी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. पुण्यातील बोपदेव घाटात हे दोघे जण रात्री 11 वाजता गेले होते. ते ज्या ठिकाणी होते अगदी सुनसान होते. तिथे कोणीही नव्हते. त्याचाच गैरफायदा या तिन अज्ञान आरोपींनी घेतला. या दोघांनाही दमदाटी करण्यात आली. त्यांना भिती दाखवण्यात आली. त्यानंतर तिघांनीही तरूणीवर अत्याचार केले. तिथून नंतर ते पसार झाले. या घटनेनंतर पीडित तरूणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्राईम ब्रँच आणि कोंढवा पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

ट्रेंडिंग बातमी - बारामतीचे मैदान अजित पवारांनी सोडले? 'त्या' वक्तव्याने संभ्रम वाढला, नवा उमेदवार कोण?

पुण्यात गेल्या काही दिवसापासून महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. बारामतीतल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर शाळेतल्या दोन चिमुकल्यांवरही स्कूलबस चालकाने अत्याचार केल्याची घटनाही ताजी आहे. तर एका घटनेत बापानेच आपल्या मुलीला अश्लील व्हीडिओ दाखव तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर  बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरुणीवर गँगरेपची घटनाही घडली आहे. त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 

Advertisement