![बारामतीचे मैदान अजित पवारांनी सोडले? 'त्या' वक्तव्याने संभ्रम वाढला, नवा उमेदवार कोण? बारामतीचे मैदान अजित पवारांनी सोडले? 'त्या' वक्तव्याने संभ्रम वाढला, नवा उमेदवार कोण?](https://c.ndtvimg.com/2024-08/a06padgo_ajit-pawar_625x300_14_August_24.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने चांगलाच धक्का दिला. त्यांचे होम ग्राऊंड असलेल्या बारामतीतही त्यांना पराभवाच झटका मिळाला. त्यामुळे अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पाऊल हे जपून टाकत आहेत. आतापर्यंत बारामतीत पराभव हा शब्द अजित पवारांना माहित नव्हता. मात्र पत्नीच्या पराभवाचा चांगलाच धसका त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक अजित पवार बारामतीतून लढणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. त्याला कारणही अजित पवारांची वक्तव्य आहेत. नुकत्याच बारामतीत झालेल्या एका सभेत अजित पवारांनी असेच काही वक्तव्य केले आहे. ज्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीचे मैदान सोडले का अशी जोरदार चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होवू शकते. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या निवडणुकीत काका पुन्हा एकदा पुतण्यावर भारी पडल्याचे संपुर्ण देशाने पाहीले. बारामती लोकसभेची जागा तर अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती.संपूर्ण ताकदीने अजित पवारांनी जोर लावला होता. पण शरद पवारांनी अशी काही चक्र फिरवली की अजित पवार चारी मुंड्या चित झाले. आपण कुठे कमी पडलो हे अजूनही अजित पवारांनी समजले नाही. शिवाय आपण आजही पॉवरफूल आहोत हे शरद पवारांनी दाखवून दिले.
ट्रेंडिंग बातमी - एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह! मुलींच्या सुरक्षेसाठी काय आहे पंचशक्ती अभियान?
शिवाय आतापर्यंतचा इतिहास पाहाता जो व्यक्ती शरद पवारांना सोडून गेला तो पुन्हा: राजकारणात कधीही स्थिरस्तावर झाला नाही. ही पार्श्वभूमी पाहाता अजित पवार प्रत्येक पाऊल हे जपून टाकत आहेत. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या बारामतीतल्या सभेत आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. बारामतीकरांना अजित पवारांनी भावनिक साद घातली. लोकसभा निवडणुकीत समोरच्या पक्षाकडे बुथवर माणसं नव्हती अशी स्थिती होती. मात्र त्या निवडणुकीत काय झालं, ते सर्वांनी पाहीलं. त्याचा मी पण विचार केला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मी जो उमेदवार देईन, त्याला तुम्ही निवडून आणायचं आहे. त्यांच्या यावक्तव्यामुळे अजित पवारांनी बारामतीचा मैदान सोडले का? याची चर्चा सुरू झाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'अजित पवारांनी भ्रष्टाचारी वृत्तीची पिढी तयार केली' दादांचा खंदा समर्थक भडकला
हे बोलत असताना अजित पवार म्हणाले. आता हा आमदार कसा निवडून द्यायचा हे तुम्ही ठरवा.अजित पवार ज्या वेळी हे वक्तव्य करत होते त्यावेळी उपस्थितांनी मात्र गोंधळ घातला. कार्यकर्ते आक्रमक झाले. अजित पवार हेच उमेदवार असावेत अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांना अजित पवारांनी यावेळी शांत केलं. अजित पवार जर बारामतीतून माघार घेणार असतील तर त्यांच्या ऐवजी उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित पवारांचा मुलगा पार्थ आणि जय यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित आहे. लोकसभेत पराभव झाला. आता विधानसभेत नको याचाच धसका अजित पवारांनी घेतला की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE: राहुल गांधी आज कोल्हापुरात, काय बोलणार याकडे लक्ष
दरम्यान एकीकडे अजित पवार बारामतीतून माघार घेणार असल्याचे संकेत देत असताना दुसरीकडे ते असेही म्हणाले आहेत की पुढच्या वेळी मी महायुतीचा अर्थ संकल्प तुमच्या आशीर्वादाने मांडेन. याचेही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. जर अजित पवार बारामतीतून लढणार नसतील तर ते विधान परिषदेवर जाणार आहेत का? याबाबतही आता वेगवेगळे तर्क लावले जात आहे. शिवाय बारामती शिवाय दुसऱ्या सुरक्षित मतदार संघातून अजित पवार उभे राहाणार तर नाहीत नाही असेही बोलले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world