Tiger Hunting : वाघांची निघृणपणे हत्या करणारा कुप्रसिध्द शिकारी अजित राजगोंडला 6 दिवसांची वन कोठडी

बहेलिया टोळीतील कुप्रसिद्ध शिकारी अजित राजगोंड गेली दीड दोन वर्षे विदर्भात वास्तव्याला असल्याचे उघड झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, प्रतिनिधी

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल असलेला अजित राजगोंड तब्बल 11 वर्षानंतर विदर्भात परत आल्याचे उघडकीस (Tiger Hunting) आले आणि त्याला अटक करण्यात वन विभागाला यश मिळाले. अजित राजगोंडला वाघांची शिकार केल्याप्रकरणी सहा दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या एक-दोन वर्षातील वास्तवादरम्यान मध्य भारतातून त्याने किमान दहा वाघांची शिकार केली असावी असा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला जात आहे. 

वन्य पशू पक्षी जिवंत किंवा मृत पकडून त्यांचा व्यापार करणाऱ्या बहेलिया शिकारी टोळीतील सुत्रधारांपैकी एक असलेला अजित शिकारीत तरबेज आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी तब्बल वीस वाघांच्या शिकारी प्रकरणी गजाआड झालेला अजित राजगोंड तुरुंगातून सुटून आल्यावर पुन्हा सक्रिय झाला होता. या दरम्यान 2023 मध्ये वाघांच्या शिकारीचे प्रकरण पुढे आले होते. 

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

70 लाखांचे आर्थिक व्यवहार उघडकीस
राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथील वस्तीलगतच डेरा टाकून अजित आणि त्याचे कुटुंबीय राहत होते, असे निदर्शनास आले आहे. स्थानीय वन विभागाचे कर्मचारी, पोलीस, पोलीस पाटील किंवा अन्य कुणालाही थांगपत्ता लागू न देता अजित बऱ्याच काळापासून याच ठिकाणाहून संपूर्ण भारतातील शिकारीची सूत्रे हलवत असल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. त्याच्या भ्रमणध्वनी द्वारे किमान 70 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे देखील समोर आल्याने त्याने केलेल्या कृत्यांची माहिती घेणे आवश्यक झाले आहे. अजितला ताब्यात घेतलं जात असताना त्याचा भाऊ आणि साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले. ताब्यात घेतलेल्या अजितच्या कुटुंबीयांना आधी सोडण्यात आलं होतं, मात्र आता चौकशी करिता पुन्हा त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.  

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - black magic: कान कापलेला बोकड, पाय बांधलेल्या कोंबड्या अन् स्मशानभूमी, मध्यरात्री काय घडलं?

यापुढील तपास महत्त्वाचा...
ही चौकशी महत्त्वाची ठरणार आहे. त्यातून कितीतरी बेपत्ता वाघांच्या हत्येचा सुगावा लागू शकतो, अशी आशा आहे. यापूर्वी एक दोन वर्षात पूर्व विदर्भ क्षेत्रातून कितीतरी वाघ बेपत्ता झाल्याचे बोलले जात आहे. ताडोबातील विख्यात माया ही वाघीण अद्याप बेपत्ता आहे. पेंचमध्ये अलीकडेच दोन बछड्यांना उपासमारीने मरण आले याला कारण म्हणजे त्यांची आई वाघीण बेपत्ता होणे हे होय.