लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱ्याला बेदम मारहाण, मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार;इंदूर हादरले

लेफ्टनंट दर्जाच्या दोन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर या अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रिणीवर मारहाण करणाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला.

Advertisement
Read Time: 2 mins
इंदूर:

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh)  इंदूरमध्ये (Indore District) एक हादरवणारी घटना घडली आहे. लेफ्टनंट दर्जाच्या दोन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना (Army Officers) बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर या अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रिणीवर मारहाण करणाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. बुधवारी (11 सप्टेंबर) पहाटे इंदूरमधल्या प्रसिद्ध जाम गेट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांची ओळख पटवली असून त्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्याचे दोन अधिकारी मारहाणीत जबर जखमी झालेत. 

नक्की वाचा : हॅलो, याकूब मेमनचा पैसा तुझ्या खात्यात आलाय! डॉक्टर घाबरला आणि....

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱ्याने नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो त्याचा सैन्य दलातील सहकारी अधिकारी आणि त्यांच्या मैत्रिणी असे चौघेजण महू-मंडलेश्वर मार्गावर असलेल्या जाम गेट जवळच्या अहिल्या गेट परिसरात गेले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सैन्य दलाचा अधिकारी आणि त्याची मैत्रीण असे गाडीत असताना त्यांच्या गाडीला सहा जणांनी घेरले होते. दुसरा अधिकारी आणि त्याची मैत्रीण हे जवळच असलेल्या टेकडीवर गेले होते. आपल्या साथीदारांना घेरल्याचे पाहून ते पळत कारजवळ आले होते. इथून भयंकर घटनेला सुरुवात झाली. 

नक्की वाचा : IAF अधिकाऱ्याची वरिष्ठांविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार, ओरल....साठी बळजबरी केल्याचा आरोप

तक्रारदाराने म्हटले की गुंडांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. यानंतर त्यांनी दोन अधिकाऱ्यांपैकी एकाला 10 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. ही संधी मिळताच या अधिकाऱ्याने महू येथील त्यांच्या वरिष्ठांना घडला प्रकार सांगण्याची संधी मिळाली. वरिष्ठांनी पोलिसांना ही बातमी सांगितली ज्यानंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस घटनास्थळी रवाना करण्यात आले. तोपर्यंत हल्लेखोर हे जवळच्या जंगलात पळून गेले होते.

पोलिसांनी चौघांना महूच्या रुग्णालयात दाखल केले जिथे या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.  तक्रारदाराने त्याच्यासोबत असलेल्या महिला मित्रावर हल्लेखोरांनी सामूहिक बलात्कार केल्याचीही तक्रार केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात सामूहिक बलात्कार, मारहाण, खंडणी, मारहाण करणे असे गुन्हे नोंदवले आहेत.  पोलिसांनी उर्वरीत आरोपींचा शोध घेण्यासाठी जवळच्या जंगलात शोध मोहीम सुरू केली आहे.