Nagpur Crime : AI च्या मदतीने कसा शोधला ट्रक? नागपूरातील 'त्या' रस्ते अपघातात मोठी अपडेट 

सुमारे सातशे किलोमीटर दूर ग्वालियर–कानपूर हायवेवर या ट्रक चालकाला नागपूर ग्रामीण पोलिसांनी पकडले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur Crime : काही दिवसांपूर्वी नागपूर-जबलपूर हायवेवरुन (Nagpur-Jabalpur Highway) एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं होतं. एक पती आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीच्या मागच्या बाजूला बांधून सुसाट वेगाने चालला होता. ते दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला अन् अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. एका ट्रकने कट मारल्यामुळे हा अपघात झाला होता. रस्त्यात कोणत्याही वाहनचालकाकडून मदत न मिळाल्याने त्या व्यक्तीला दुचाकीवरच पत्नीचा मृतदेह घेऊन जावे लागले होते. अखेर महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या ट्रक चालकाचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलं आहे.  एआयच्या मदतीने ट्रक चालकाचा शोध घेण्यात आला आहे. 

सुमारे सातशे किलोमीटर दूर ग्वालियर–कानपूर हायवेवर या ट्रक चालकाला नागपूर ग्रामीण पोलिसांनी पकडले. सत्यपाल राजेंद्र असे ट्रकचालकाचे नाव असून तो फर्रुखाबाद, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.

नक्की वाचा - Gadchiroli Road Accident : मॉर्निंग वॉकला गेले अन् घात झाला; ट्रकच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू

AI च्या पद्धतीने कसा घेतला शोध...?

या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी AI ऑपरेटेड Marvel या सॉफ्टवेअरच्या मदतीने तपास केला. अपघात करणाऱ्या ट्रकचा सरासरी वेग (average speed) कॅल्क्युलेट करण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. अपघात करणारा ट्रक लाल रंगाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच मार्गावरील हायवे सीसीटीव्ही फुटेज AI च्या माध्यमातून स्कॅन करण्यात आले. या प्रक्रियेत एकूण पाच ट्रक आढळले. त्यानंतर या पाचही ट्रकचा वेग आणि लोकेशन तपासल्यानंतर आरोपी सत्यपाल राजेंद्र याचा शोध लागला. नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्याला फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश येथे अटक केली.

Advertisement

Topics mentioned in this article