Ratnagiri News दिल्लीतील सज्जाद अहमद खानची 50 लाखांची फसवणूक, परदेशातून 50 जण भारतात परतले, 2 भावांचं कांड उघड

परदेशात नोकरीला लावण्याचे आणि कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील एका व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ratnagiri Money Fraud Case (Photo AI)

राकेश गुडेकर, प्रतिनिधी 

Ratnagiri Crime News Today : परदेशात नोकरीला लावण्याचे आणि कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील एका व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे.नवी दिल्ली येथील सज्जाद अहमद खान यांनी या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यावरून दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसाम इरफान जांभारकर आणि अस्लम इरफान जांभारकर अशी आरोपींची नावं असून ते दोघेही भाऊ आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुकीची ही घटना 1 जुलै 2025 ते 1 मे 2026 दरम्यान घडली.फिर्यादी सज्जाद खान यांना परदेशात कामगार पाठवून मोठे कमिशन मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले होते. आरोपींवर विश्वास ठेवून खान यांनी एकूण 56 व्यक्तींना परदेशात नोकरीला लावण्यासाठी प्रत्येकी 85000 रुपये याप्रमाणे एकूण 50 लाख रुपये जमा केले. त्यांनी ही रक्कम आरोपींना मिरजोळे,रत्नागिरी येथील त्यांच्या निवासस्थानी रोख स्वरूपात दिली होती.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: अख्ख्या महाराष्ट्रात संतापाची लाट, नसरापूरमध्ये चिमुकलीसोबत काय काय घडलं? 22 तासांचा घटनाक्रम समोर

56 जणांना भारतात परत आणावे लागले

आरोपींनी या 56 कामगारांना नियोजित देशात किंवा कामावर न पाठवता दुसऱ्याच ठिकाणी पाठवले. त्यामुळे या कामगारांची मोठी गैरसोय झाली.अखेर फिर्यादी सज्जाद खान यांना या सर्व 56 जणांना स्वतःच्या खर्चाने पुन्हा भारतात परत आणावे लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खान यांनी रत्नागिरी गाठून पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परदेशात नोकरीला लावणाऱ्या अशा रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही तपास केला जाणार आहे.

नक्की वाचा >> Dombivli News : मित्रांचे 36 लाख लुबाडले, पत्नीच्या एका कॉलमुळे सगळा खेळ खल्लास, आशिष पवारला 1 वर्षानंतर अटक