सख्खे शेजारी पक्के वैरी अशी एक म्हण आहे. शेजाऱ्यांसोबत जितका जिव्हाळा असतो, वेळेप्रसंगी वादही तितकाच होऊ शकतो. मग त्यासाठी छोटसं कारणही पुरेसं असतं. उल्हासनगरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला मांजरीचं नखं लागल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उल्हासनगरच्या इमली पाडा परिसरात घडली आहे. या मारहाणीत राकेश रोंदिया आणि पूजा रोंदिया हे जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा - Kalyan News: आमच्या जावयाला का मारले ? जाब विचारायला गेलेल्या सासू-सासऱ्यावर तलवारीने हल्ला
पूजा रोंदिया यांच्या घरी मांजर आहे. शेजारी राहणाऱ्या अमित रोंदिया यांच्या घरातील एका लहान मुलाला मांजरीचं नखं लागल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाले आणि हाणामारी झाली. यात अमित रोंदिया, विकास रोंदिया आणि नंदा रोंदिया यांनी शेजारी राहणारे पूजा आणि त्यांचे पती राकेश यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत राकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.