Crime News: उल्हासनगरात दरोडेखोरांचा हैदोस! रिक्षातून जाणाऱ्या तरुणाला लुटलं, चाकू दाखवत पलायन

उल्हासनगरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईचे कौतुक व्यक्त होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

उल्हासनगर: उल्हासनगरात पुन्हा एकदा दरोडेखोरांचा धुमाकूळ समोर आला आहे. २७ वर्षीय अजयकुमार शामल गौतम हे २२ ऑगस्ट  रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ते आपल्या मित्रासोबत रिक्षाने श्रीराम चौक ते उल्हासनगर कॅम्प ५ येथे जात सरकारी प्रसुतीगृहाजवळील ‘रिअल टच' दुकानाजवळ आरोपीने रिक्षा थांबवून फिर्यादीला किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ करून मारहाण केली.

त्यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्याच्या साथीदाराकडून तब्बल २१ हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने लुटली. एवढेच नाही तर आरोपीने रिक्षाचालकाला देखील चाकू दाखवत स्टेशनकडे पलायन केले. या गंभीर गुन्ह्याची नोंद विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.

Dhule News: भर दिवसा 2 पोलिसांना मारहाण, कानाखाली मारतानाचा Video होतोय व्हायरल

सर्टीफाय स्कूलसमोरील मैदान, उल्हासनगर-४ येथे सापळा लावून पोलिसांनी आरोपी संजय रतन राठोड यास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात लुटलेले २१ हजार रुपये व चाकू जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस १ सप्टेंबर रोजी पहाटे अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबर पर्यंत पोलिस कस्टडी ठोठावली आहे. उल्हासनगरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईचे कौतुक व्यक्त होत आहे.

Advertisement

Malegaon News: मदत मागायला गेली अन् वासनेची शिकार झाली! MIM नेत्याचे भयंकर कृत्य, अखेर...

Topics mentioned in this article