जाहिरात

Dhule News: भर दिवसा 2 पोलिसांना मारहाण, कानाखाली मारतानाचा Video होतोय व्हायरल

त्यानंतर त्याला जाब विचारण्यासाठी पोलिस त्याच्या दिशेने धावले.

Dhule News: भर दिवसा 2 पोलिसांना मारहाण, कानाखाली मारतानाचा Video होतोय व्हायरल
धुळे:

पोलिस हे आपल्या संरक्षणासाठी असतात. पण आता पोलिसांनाच संरक्षण द्यावे लागणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसच असुरक्षित असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. भर रस्त्यात सर्वां समोर एक नाही तर दोन पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.  धुळे शहरातील पाच कंदील परिसरामध्ये ही घटना घडली आहे. त्याचा व्हिडीओ ही सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पोलिसांना मारताना एक तरुण दिसत आहे. 

धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सतीश फुलपगारे आणि दीपक सैंगदाणे हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांनी त्यांची पोलीस गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. याच वेळी एक गाडी भरधाव वेगात आली. त्या गाडीने पोलिसांच्या गाडीला धडक दिली. धुळे तालुक्यातील सडगाव येथील रहिवासी असलेला सोपान पाटील हा गाडी चालवत होता. शिवाय तो मध्यधुंद अवस्थेत होता. त्याच स्थितीत त्याने गाडीला जोरदार धडक दिली.  

नक्की वाचा - मोठा पेच! मराठा समाजाला ‘सरसकट कुणबी' संबोधण्यास हायकोर्ट- सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार

त्यानंतर त्याला जाब विचारण्यासाठी पोलिस त्याच्या दिशेने धावले. त्यावेळी त्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सोपान पाटील याने कुठलाही विचार न करता सतीश फुलपगारे व दीपक शेंगदाणे या दोघा पोलीस हवालदारांना शिवीगाळ केली. तो तेवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने त्या दोघांच्या अंगावरही हात घातला. दोघांच्या ही कानशिलात त्याने लगावली. तिथं असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला. 

Manoj Jarange Patil Maratha Morcha : मराठा आंदोलनादरम्यान हळहळ! आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू

यावेळी पाचकंदील परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती. पोलीस कर्मचारी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र तो काही ही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. तो पोलिसांना शिवीगाळ करीत त्यांना मारहाण करीत होता. त्यानंतर त्याला पकडून घेवून जाण्यात आले. त्यावेळी त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात असलेल्या सामानाची ही तोडफोड केले. मोठा राडा यावेळी पाहायला मिळाला. त्याच्या विरोधात आता पुढील पोलीस कारवाई करीत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com