जाहिरात
This Article is From Jul 31, 2024

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच!

कुख्यात गँगस्टर, अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार दिला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच!
नवी दिल्ली:

कुख्यात गँगस्टर, अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार दिला आहे. गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. वयाचं कारण देत गवळीच्या वकिलाने सुट्टीची मागणी केली होती. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अरूण गवळीला  2012 साली मकोकाअंतर्गत 40 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 14 वर्षांची शिक्षा पूर्ण झालेल्या आरोपीला रेमिशनवर सोडलं जात. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणी आणि गुन्हेगारी कृत्यासाठी अरूण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या गुन्हाअंतर्गत ते नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. वयाच्या कारणाने गवळीच्या वकिलाने कोर्टाकडे सुट्टीची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गवळीला पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार दिला आहे. 

बातमी अपडेट होत आहे.