जाहिरात

100%अपंगत्व, मेंदूच्या सुकलेल्या नसा अन् 13 वर्ष अंधारमय जीवन, हरीश राणांना इच्छा मरणाची परवानगी,काय आहे कहाणी

Harish Rana Passive Euthanasia: हरीश राणा यांना सुप्रीम कोर्टाने 'इच्छा मरणाची' परवानगी दिली आहे. 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या आपल्या मुलाच्या वेदना थांबवण्यासाठी पालकांनी हा कठीण निर्णय घेतला. कोण आहेत हरीश राणा आणि काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

100%अपंगत्व, मेंदूच्या सुकलेल्या नसा अन् 13 वर्ष अंधारमय जीवन, हरीश राणांना इच्छा मरणाची परवानगी,काय आहे कहाणी
"Harish Rana Passive Euthanasia: कोण आहे हरिश राणा? ज्यांना इच्छा मरणाची परवानगी मिळाली"
  • उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी हरीश राणा यांना सुप्रीम कोर्टाने इच्छा मरणाची परवानगी दिली आहे
  • हरीश राणा वर्ष 2013 पासून कोमामध्ये असून त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
  • हरिश राणा यांची प्रकृती सुधारण्याचे कोणतेही संकेत नाही
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Harish Rana Passive Euthanasia: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील रहिवासी हरीश राणा यांना सुप्रीम कोर्टाने 'पॅसिव्ह यूथेनेशिया' म्हणजेच इच्छा मरणाची परवानगी दिली आहे. इच्छा मरणाची परवानगी मिळणारी देशातील ही पहिलीच घटना मानली जात आहे. गेल्या 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेले हरीश सध्या फक्त श्वास घेत आहेत, पण वर्ष 2013 पासून ते अंथरुणाला खिळून आहेत.

सुप्रीम कोर्टाने त्यांच्या याचिकेवर निकाल देताना म्हटले की, हरीश यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आता कोणतीही आशा उरलेली नाही. अशा स्थितीत त्यांना जिवंत ठेवणे म्हणजे केवळ त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात भर घालण्यासारखे आहे. मागील सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांच्या पालकांशी सविस्तर चर्चा केली होती. 100 टक्के अपंगत्वाचा शिकार झालेल्या आपल्या मुलाच्या जगण्याची आशा सोडल्यानंतर, हताश झालेल्या पालकांनीच कोर्टाकडे इच्छा मरणाची ही मागणी केली होती.

कोण आहेत हरीश राणा आणि त्यांच्यासोबत काय घडले होते?

हरीश राणा (Harish Rana News) हे चंदिगड युनिव्हर्सिटीत सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होते. शालेय जीवनापासूनच त्यांना बॉडीबिल्डिंगची प्रचंड आवड होती. ते आपल्या आरोग्य आणि भविष्याबाबत अत्यंत गंभीर होते. पण 20 ऑगस्ट 2013 या तारखेने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. हरीश राहत असलेल्या पीजीच्या (PG) चौथ्या मजल्यावरून अचानक खाली पडले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि एका धडधाकट तरुणाचे आयुष्य कायमचे चार भिंतींच्या आत बंदिस्त झाले.

Latest and Breaking News on NDTV

आई-वडिलांचा 13 वर्षांचा संघर्ष

अपघातानंतर हरीश यांचे वडील अशोक राणा यांनी मुलाला वाचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले.  चंदिगड PGI पासून ते दिल्लीतील AIIMS पर्यंत  देशातील अशा अनेक प्रसिद्ध खासगी रुग्णालयांचे उंबरठे त्यांनी झिजवले. पण डॉक्टरांच्या मते डोक्याला झालेल्या जखमेमुळे हरीश यांच्या मेंदूच्या नसा सुकल्या आहेत. ते गेल्या 13 वर्षांपासून तांत्रिकदृष्ट्या जिवंत असून पूर्णपणे कोमामध्ये आहेत. त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नाही, ते काहीही बोलू शकत नाहीत किंवा अनुभवू शकत नाहीत. अधूनमधून पापण्यांची होणारी हालचाल हाच काय तो त्यांच्या जिवंत असण्याचा एकमेव पुरावा उरला आहे.

पालकांची आर्त हाक: "आता या वेदना सहन होत नाहीत"

100 टक्के अपंगत्व आलेल्या 31 वर्षीय मुलाची ही अवस्था पाहून आई-वडील पूर्णपणे खचले होते. जेव्हा सुधारणेची कोणतीही शक्यता उरलेली नाही, तेव्हा राणा दाम्पत्याने जड अंतःकरणाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आपल्या मुलासाठी इच्छा मरणाची (Passive Euthanasia) मागणी केली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com