
उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेठी जिल्ह्यात एका लग्न समारंभात तंदुरी रोटी आधी कोण घेणार? यावरून झालेल्या वादात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. ही खळबळजनक घटना जामो पोलीस स्टेशन परिसरातील बलभद्रपूर गावात घडली. घटनेने लग्नघरात शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (3 मार्च) घडली. बलभद्रपूर गावातील रहिवासी रामजीवन वर्मा यांच्या मुलीचे लग्न सुरू होते. लग्नाची वरात शांततेत पोहोचली आणि विधी पार पडत होते. जेवणाची वेळ होताच तंदुरी रोटी वाढायला सुरुवात झाली. यावेळी 18 वर्षीय रवी कुमार उर्फ कल्लू आणि 17 वर्षीय आशिष कुमार यांच्यात प्रथम कोणाला रोटी मिळेल? यावरून वाद झाला. हा किरकोळ वाद इतका वाढला की दोन्ही तरुणांनी एकमेकांवर काठ्यांनी हल्ला केला.
या हिंसक मारामारीत आशिषचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या रवीला लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात येत होते. पण वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची बातमी कुटुंबाला मिळताच लग्नघरात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
(नक्की वाचा- हळदही सुकली नव्हती... नवरदेवाने नवरीच्या मांडीवर जीव सोडला, मन सुन्न करणारी घटना!)
दरम्यान, याप्रकरणी गौरीगंज सर्कलचे सीओ अखिलेश वर्मा म्हणाले की, लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली ज्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तक्रार आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे तपास केला जाईल. या प्रकरणात जे काही तथ्य समोर येईल त्याच्या आधारे कारवाई केली जाईल.
(नक्की वाचा- Rahul Gandhi: 'त्यावेळी मी नव्हतो, पण...', शिख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world