
Love Jihad Case : इंस्टाग्रामवर सुरू झालेली मैत्री एका हिंदू मुलीसाठी दुःख आणि अत्याचाराचं कारण ठरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तौफिक नावाच्या व्यक्तीने मुलीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ बनवले. त्यानंतर ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळले. इतकंच नाही, तर मुलीचं धर्म परिवर्तन करून तिला मुस्लिम बनवण्यात आलं. या लग्नातून त्यांना एक बाळही झालं, पण आता तौफिक मुलीला सोडून दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील इकौना पोलीस स्टेशन हद्दीतील विशुनापूर येथील हे प्रकरण आहे. सुमारे 6 वर्षांपूर्वी तौफिकने सोशल मीडियाद्वारे नागपूरच्या एका हिंदू मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले. या प्रकरणात मुलीचा आरोप आहे की, तौफिकने आधी तिच्याशी मैत्री केली आणि नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओही बनवले.
हिंदू मुलीचे धर्मांतर
या व्हिडिओच्या माध्यमातून तौफिकने मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पीडितेने सांगितले की, तौफिक नावाचा मुलगा तिला व्हिडिओ दाखवून अनेक वर्षांपासून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता आणि तिच्याकडून लाखो रुपये उकळत होता. सुमारे 3 वर्षांनंतर तौफिकने हिंदू मुलीचं धर्म परिवर्तन करून तिला मुस्लिम बनवलं आणि तिच्याशी निकाह केला. काही दिवसांनी मुलगी आई झाल्यावर तौफिक तिला सोडून पळून गेला.
( नक्की वाचा : 15 दिवसांची बायको ! 'या' मुस्लीम देशात धडाधड होत आहेत लग्न! वाचा काय आहे भानगड? )
मुलीचे गंभीर आरोप
पीडित मुलीनं कसबसं तौफिकचं घर गाठलं, जिथे तिच्यावर सुमारे तीन वर्षांपासून कुटुंबातील सदस्यांनी अनेक अत्याचार केले. इतकंच नाही, तर तिला दुसऱ्यासोबत संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आलं, असा आरोप पीडित मुलीनं केला आहे. . तिच्यावर गायीचं मांस खाण्यासाठी दबाव आणला गेला. मुलीकडून सतत पैशांची मागणी केली जात होती आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलाला खायला काहीही दिलं जात नव्हतं. याबद्दल पीडित महिलेने अनेक वेळा इकौना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत न्यायाची मागणी केली होती.
( नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )
पण, स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आता हे प्रकरण जिल्ह्यातील मीडिया कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलं, तेव्हा पोलिसांनी तात्काळ आरोपी पती तौफिक आणि कुटुंबातील 5 जणांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world