Crime News: पॉवरच्या गोळ्या, पती, पत्नी अन् प्रियकर; हत्येचा भयंकर कट, पोलिसही हादरले!

प्रेमप्रकरणात पती आबिदचा मोठा अडथळा होता त्यामुळे त्याचा काटा काढायचा निर्णय शबानाने घेतला. त्यासाठी तिला तिचा प्रियकर रेहान अन् त्याच्या मित्राने मदत केली.

जाहिरात
Read Time: 3 mins

उत्तरप्रदेश: प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरप्रदेशच्या कानपूर शहरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी पत्नीसह प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीने पतीचा पॉवरच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा खोटा निघाला असू  यासाठी तिने रचलेला भयंकर कटही पोलीस तपासात उघड झाला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 19  जानेवारी रोजी बिठूर येथील रहिवासी आबिद अली नावाच्या व्यक्तीचा त्याच्या राहत्या घरात मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास करताना त्याच्या पत्नीने शक्तीवर्धक गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे पतीचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आबिदच्या खिशातून शक्ती वाढवणाऱ्या कॅप्सूलचे आठ पॅकेट्सही सापडले होते, ज्यामुळे पोलिसांनीही यावर विश्वास ठेवला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र दोन दिवसांनी जेव्हा आबिदचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिस ठाण्यात पोहोचला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. कारण, आबिदची गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या तपासात उन्नावमधील बांगरमऊ येथील रहिवासी रेहान आणि मृत व्यक्तीच्या पत्नीचे वारंवार मोबाईलवर बोलणे झाल्याचं समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शबाना आणि रेहानची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. 

शबाना आणि रेहानची सोशल मीडियावरुन ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीत अन् नंतर प्रेमात झाले. त्यांचे प्रेमप्रकरण इतके वाढले की शबानाचा पती घरी नसताना दोघेही भेटु लागले. त्यानंतर तिने रेहानसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या प्रेमप्रकरणात पती आबिदचा मोठा अडथळा होता त्यामुळे त्याचा काटा काढायचा निर्णय शबानाने घेतला. त्यासाठी तिला तिचा प्रियकर रेहान अन् त्याच्या मित्राने मदत केली. यासाठी तिने रेहानला वीस हजार रुपयेही दिले. 

Advertisement

( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )

शबानाचा नवरा कधीकधी सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या घेत होता. याच गोळ्यांच्या मदतीने त्याला संपवण्याचा कट पत्नीने आखला. १९ जानेवारी रोजी तिने तिच्या पतीद्वारे आठ शक्ती वाढवणाऱ्या कॅप्सूल मागवल्या. त्यानंतर रेहान आणि विकासच्या मदतीने त्याची पतीची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याच्या खिशात कॅप्सूलचे पॅकेट ठेवण्यात आले होते. सकाळी उठल्यावर तिने गोंधळ घातला की तिच्या पतीने खूप जास्त शक्ती वाढवणाऱ्या कॅप्सूल घेतल्या आहेत आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.

मग रात्री तिने तिच्या प्रियकराला आणि त्याच्या मित्राला बोलावून तिच्या पतीची हत्या केली. हत्येनंतर त्याच्या खिशात कॅप्सूलचे पॅकेट ठेवण्यात आले होते. सकाळी उठल्यावर तिने गोंधळ घातला की तिच्या पतीने खूप जास्त शक्ती वाढवणाऱ्या कॅप्सूल घेतल्या आहेत आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी तपास करत या प्रकरणाचा छडा लावला अन् तिघांनाही बेड्या ठोकल्या. 

Advertisement