लग्नाळू मुलांशी विवाह करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणातील आरोपी तरुणीनं 6 जणांशी लग्न केलं. त्यानंतर ती सातव्याशी लग्न करण्याच्या तयारीत होती. पण, पोलिसांनी या टोळीतील चार जणांना अटक करत या रॅकेटचा पर्दाफाश केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बांदामधील हे प्रकरण आहे. या प्रकरणातील बनावट तरुणीचं नाव पूनम गुप्ता आणि तिच्या कथित आईचं नाव संजना गुप्ता आहे. त्यांच्यासह विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती या चार जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.
ही टोळी लग्नाळू तरुणांना टार्गेट करत असे. त्या तरुणाची पूनमसोबत ते भेट घालून देत असतं. पूनम आणि तिची आई लग्नासाठी तरुणाकडं पैशांची मागणी करत असे. कोर्टामध्ये साध्या पद्धतीनं लग्न झाल्यानंतर पूनम काही दिवस तरुणाच्या घरी राहायला जात होती. त्यानंतर संधी मिळताच ती घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार होत असे.
( नक्की वाचा : Crime News : त्यानं 11 जणांना लिफ्ट दिली, सर्वांची हत्या केली आणि मृताच्या पाठीवर लिहिलं 'धोकेबाज' )
बांदामधील शंकर उपाध्याय यांनी काही जण लग्नाच्या नावाखाली फसवणूक करत असल्याची तक्रार पोलिसांकडं केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या टोळीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर उपाध्याय यांनी तक्रार कपरण्यापूर्वी या टोळीनं यापूर्वी सहा जणांची फसवणूक केली. शंकर अविवाहित होते आणि ते लग्नासाठी मुलगी शोधत होते. त्यावेळी विमलेशनं त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शंकरचं लग्न लावून देण्यासाठी 1.5 लाख रुपयांची मागणी केली. शंकर यांनी ते पैसे देण्याची तयारी दाखवली होती.
( नक्की वाचा : Kalyan News : स्मशानभूमीची आरक्षित जमीन दडपण्याचा बिल्डरचा प्रयत्न, वाचा कसा झाला पर्दाफाश? )
विमेलेशनं शनिवारी शंकर यांना कोर्टात बोलावलं आणि त्यांची आणि पूनमची ओळख करुन दिली. त्यावेळी विमलेशनं 1.5 लाख रुपयांची मागणी केली. शंकर यांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं. त्यामुळे त्यांनी पूनम आणि तिची आई असल्याचं सांगत असलेल्या संजनाकडं आधार कार्डाची मागणी केली.
'त्यांच्या हावभावावरुन ते फसवणूक करत असल्याचा मला संशय आला. मी लग्नाला नकार दिल्यानंतर त्यांनी मला ठार मारण्याची तसंच खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यावर मला लग्न करण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगून मी तिथून निघालो,' असं तक्रादार शंकर उपाध्याय यांनी सांगितलं.
बांदाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक शिवराज यांनी सांगितलं की, 'आम्हाला तक्रारदारनं लग्नाच्या नावाखाली फसवणूक होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर आम्ही तातडीनं आमची टीम अलर्ट केली. आम्ही चार जणांना अटक केलीय. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. ही टोळी अविवाहित तरुणाची लग्नाच्या नावाखाली फसवणूक करत असतं. आम्ही त्यांना अटक केली असून त्यांची पुढील चौकशी सुरु आहे.'