
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी आणि वैष्णवीच्या कुटुंबीयांना पिस्तुल दाखवून धमकवणारा निलेश चव्हाण अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं कार्यरत आहेत. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पोलिसांची सहा पथके कार्यरत आहेत. दरम्यान निलेश चव्हाणला पकडून आणणाऱ्याला पोलिसांनी बक्षीसही जाहीर केलं होतं. दरम्यान निलेश चव्हाणला पकडल्याची खोटी माहिती देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड सिटी पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फरार निलेश चव्हाण पकडल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती
संतोष दत्तात्रय गायकवाड, (वय 33) याच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निलेश चव्हाण या फरार आरोपीची माहिती आपण पोलिसांना दिली तर पोलिसांकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल, या हेतूने संतोष दत्तात्रय गायकवाड या तरुणाने 112 या क्रमांकावर पोलिसांना फोन केला. तरुणाने फोन करणाऱ्यांनी ‘आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाण हा पकडून ठेवला आहे.
त्याची जवळ दोन पिस्तूलं आहेत. आम्ही त्याला मारहाण करून गाडीचे डिक्कीत ठेवले आहे.' असे सांगितल्याने त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली. ती व्यक्ती किरकटवाडी, येथील पानशेत रस्त्यावरील स्वागत हॉटेल येथे मिळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. शेवटी या व्यक्तीने खोटे कॉल करत असल्याचं समोर आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world