Vasai News: पोलीसांच्या तावडीतून आरोपी पळाला, ड्रममध्ये लपला, चोर पोलीसांच्या खेळात कोण जिंकलं?

त्याच वेळी पोलीसांची मात्र दमझाक झाली होती. ते शोधाशोध करत होते. तो सापडत नव्हता.

जाहिरात
Read Time: 3 mins
वसई:

मनोज सातवी 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी दानिश जमीर खान या आरोपीला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्याने हे कृत्य केलं होतं. त्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने अटक केली. तो 23 वर्षाचा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यानंतर त्याला वसईच्या पेल्हार पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले होते.  अटक केल्यानंतर त्याला आज सोमवारी वसईच्या कोर्टात हजर करण्यात येणार होते. त्यासाठी त्याला कोर्टात आणले गेले. पण त्याच वेळी या आरोपीने संधी साधली. लघुशंकेला झाली आहे असं सांगून तो टॉयलेटमध्ये गेला.  त्या टॉयलेटला ग्रील नव्हते. त्यामुळे त्याने खिडकीच्या काचा काढून तिथून पळ काढला.  त्यानंतर तो तिथून पसार झाला. अचानक झालेल्या याघटनेनं पोलीसही हादरून गेले. 

एकच पळापळ सुरू झाली. मग नंतर सुरू झाला चोर पोलीसांचा खेळ. हा खेळ जवळपास अर्धा तास चालला. पोलीसांना टकवा देवून आरोपी दानिश तिथून सटकला. पण तो जास्त लांब पळू शकला नाही. तो थकला. त्यामुळे त्याने लपण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली. तो वसई पंचायत समिती जवळ असलेल्या एका वाडीत घुसला. तिथे एक मोकळा पाण्याचा ड्रम होता. त्या ड्रममध्ये जावून तो लपला. स्थानिकांना काही तर झालं आहे याचा अंदाज आला होता. तोपर्यंत या आरोपीनं ड्रम हा त्याचा सुरक्षित ठिकाणा शोधला होता. तिथे तो लपून बसला होता. 

नक्की वाचा - Emotional story: लेक अमेरिकेत, आई-बाबा गावी!, ती शिकली, मोठी झाली, चांगले दिवस येणार त्याच वेळी...

त्याच वेळी पोलीसांची मात्र दमझाक झाली होती. ते शोधाशोध करत होते. तो सापडत नव्हता. त्यामुळे पोलीसांचे टेन्शन वाढत होते. पोलीस शोधत शोधत वसई पंचायत समिती जवळ पोहोचले. त्यावेळी काहींनी एक जण वाडीत पळाल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलीस त्या वाडीत गेले. तिथे त्यांना रिकाम ड्रम दिसला. त्यात आरोपी असल्याचं पोलीसांना दिसलं. त्यांनी त्याला बाहेर येण्यास सांगितलं. तुला कुणी काही करणार नाही असं त्याला बोलले. तुला मारणार नाही असं ही सांगितलं. आता बाहेर ये असं त्याला सांगण्यात आलं. त्यावर अर्धा तासानंतर आरोपी बाहेर आला.

नक्की वाचा - जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत 12 हजार 500 रूपये प्रति किलो, कुठे मिळतो माहित आहे का?

लगेचच पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं. पळायचं कशाला असं ही त्याला सांगितलं. मागून काही पोलीस आले. त्यांनी त्याला फटकवण्याचा प्रयत्न केला. पण वरिष्ठांनी त्यांना रोखलं. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. तिथून त्याला पेल्हार पोलीस स्थानकात नेण्यात आलं. असा अर्धा तास हा चोर पोलीसांचा खेळ कोर्टाच्या परिसरात सुरू होता. या आरोपी दानिशने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. तिच्या भावाच्या तक्रारीनंतर पोलीसांनी धुमाळनगर परिसरात चौकशी केली. गु्प्त माहिती अधारे हा गुन्हा दानिशने केल्याचं निष्पन्न झालं. पोलीसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याने गुन्हा ही कबूल केला होता. 

Advertisement

नक्की वाचा - Pandharpur News: गरिबांचा विठ्ठल झाला श्रीमंत! कार्तिकी वारीत विठ्ठलाच्या चरणी किती दान? आकडा आला समोर

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त  निकेत कौशिक यांच्या नेतृत्वात झाली. शिवाय दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली झाली.  गुन्हे शाखा कक्ष 2 वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहा. पोलीस निरीक्षक सोपान पाटील, म. सपोनि तेजस्विनी शिंदे, पोलीस उप निरीक्षक संतोष घाडगे, अजित गिते, सहा. फौज संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, चंदन मोरे, मनोज मोरे, पोहया प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकूर, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, राहुल कर्पे, दिलदार शेख, पो.अं. अनिल साबळे, मसुब रामेश्वर केकान गुन्हे शाखा कक्ष 2 वसई तसेच तुळींज पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सुनिल पवार व त्यांचे पथक, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सफी संतोष चव्हाण यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.