मनोज सातवी
बहीण आणि भावाचं नातं हे सर्व नात्यांपलिकडचं असतं. काही वेळा घरात भावाचे लाड होतात. तर काही वेळा बहिणीचे लाड केले जातात. पण या गोष्टीचे विपरीत परिणाम ही बालमनावर होत असतात. एकमेकाबद्दल त्यातून आकसही निर्माण होतो. त्यातून भयंकर कृत्य केली जातात. अशीच काहीशी घटना ही वसईमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ तर व्यक्त होत आहे पण सर्व जण हादरुनही गेले आहेत. या घटनेनं अनेक पालकांना विचार करण्याचीही वेळ आली आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वसईच्या नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसर आहे. त्या ठिकाणी एक कुटुंब राहते. इथं राहणाऱ्या मामाच्या मुलीचे सर्वच जण लाड करतात. तिलाच भेट वस्तू देतात. आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं. याचा राग आपल्या मामेबहिणीबद्दल तिच्या 13 वर्षाच्या भावाच्या मनात होता. त्याची मामेबहिणी ही अवघ्या 6 वर्षांची होती. पण त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड राग होता. त्यामुळे त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले.
नालासोपारा पूर्वीच्या संतोष भवन परिसरात ती कुटुंबीयांसोबत राहत होती. शनिवारी तिच्या भावाने तिला खेळण्यासाठी बोलवले. ते दोघेही खेळण्यासाठी बाहेर पडले. पण परत येताना तो एकटाच घरी आला. सहा वर्षाची त्याची बहीण त्याच्या बरोबर नव्हती. त्यामुळे तिची शोधाशोध घरातल्यांनी केली. घरा जवळ असलेल्या सीसीटीव्ही त्यांनी चेक केला. त्यात ते दोघेही दिसले. जाताना ते दोघे होते. पण येताना मात्र तो एकटाच येत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले.
याबाबत पोलीसांनी त्या अल्पवयीन तरुणाला याबाबत विचारणा केली. त्यावर त्याने जी कबुली दिली त्याने सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने खेळण्याच्या बहाण्याने बहीणीला जंगलात नेलं. तिथे त्यानं तिचा गळा आवळला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. शिद्राखातून असं या सहा वर्षाच्या खून करण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे. या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी विधी संघर्ष ग्रस्त बालकास ताब्यात घेतले असून, अधिक तपास केला जात आहे.