
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला झालेली सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद वेगळ्याच कारणाने गाजली. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याची सल एकनाथ शिंदे यांच्या मनात अजूनही आहे. त्यांच्या या दुखत्या नसेवरच या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी बोट ठेवलं. त्यामुळे एकच हशा पिकला. अजित पवारांना डिवचण्याचं एकनाथ शिंदेंच्याच अंगाशी आलं अशी चर्चा त्यानंतर राजकीय वर्तूळात रंगली होती. बरं हे सर्व काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर होत होतं.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला अजित पवारांनी सरकारची बाजू मांडली. त्यानंतर माईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. त्यांनी सरकार नवीन असलं तरी टीम जुनीच आहे. फक्त आमच्या खुर्च्यांची आदला बदल झाली आहे. असं देवेंद्र फडणवीसांकडे पाहात वक्तव्य केलं. शिंदेंची सुरूवात तर टी ट्वेंटीच्या फलंदाजा प्रमाणे जोरदार होती. त्यानंतर त्यांनी खरी टोलेबाजी सुरू केली. आमच्या खुर्च्यांची आदलाबदल झाली आहे. पण अजित पवारांची खुर्ची मात्र फिक्स आहे, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.
हजरजबाबी असलेल्या अजित पवारांच्या मनाला शिंदे यांनी लगावलेला हा टोला लागला. त्यांनी त्याची परतफेड तिथल्या तिथे करून टाकली. तुमची खुर्ची तुम्हाला फिक्स करता आली नाही त्याला मी काय करू असं म्हणत शिंदेंनी लगावलेल्या टोल्याचा तिथल्या तिथे हिशोब अजित पवारांनी केल्या. त्यांनी अनपेक्षित पणे केलेल्या यावक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. फडणवीसही खळखळून हसले. पण शिंदेंचा चेहरा पडला. पण तेवढ्यात फडणवीसांनी सावरले. आमची रोटेटींग चेअर आहे असं ते म्हणाले. त्यानंतर शिंदे पुढच्या विषयाकडे वळले.
एकनाथ शिंदे अजित पवारांना डिवचण्यासाठी गेले खरे पण ते त्यांच्यावरच बुमरँग झाल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. दरम्यान त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे सावरले. अजित पवार हे परत अर्थसंकल्प मांडणार आहे. सर्व सामान्यांसाठी काम करणारं हे सरकार आहे. मोठं बहुमत मिळालं असलं तरी आमच्या डोक्यात हवा गेलेली नाही असंही त्यांनी सांगितले. शिवाय आमच्यात कुठल्या ही प्रकारचे कोल्डवॉर नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world