जाहिरात

Baramati Bribe : अजित पवारांच्या बारामतीतील नगरपरिषदेचा अधिकारीच भ्रष्ट; लाच घेताला रंगेहात सापडला!

प्रशासनावरती उत्तम पकड असणारा नेता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अवघा महाराष्ट्र पाहतो. मात्र त्यांच्याच बारामती शहरातील नगर परिषदेत हा प्रकार घडला.

Baramati Bribe : अजित पवारांच्या बारामतीतील नगरपरिषदेचा अधिकारीच भ्रष्ट; लाच घेताला रंगेहात सापडला!

Baramati Bribe : राज्याला भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम सांगत असतात. मात्र लाचखोरी ही दिवसेंदिवस अधिक पसरत असल्याचं दिसून येत आहे. यापूर्वीही अधिकाऱ्यांकडून लाच घेत असतानाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अगदी काही हजारांपासून ते लाखांपर्यंत लाच घेणाऱ्यांना रंगेहात पकडलं आहे. दरम्यान बारामतीतूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बारामतीतील नगर परिषदेचा नगर रचनाकार विकास ढेकळे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. बारामतीतील एका बांधकाम व्यावसायिकाने विकास ढेकळे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला विकास ढेकळे याने पावणे दोन लाखांची लाच मागितली होती. यातील एक लाख रुपये लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ढेकळे याला रंगेहात पकडलं आहे. या संदर्भातील पुढील कारवाई सुरू आहे. लाच घेण्यात फक्त ढेकळे यांचाच सहभाग होता की, ढेकळे अन्य कुणाला यातील वाटा देत होते याचा देखील शोध घ्यायला हवा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Meerut Crime : 'आमच्या लेकीला फाशीच द्या'; मेरठमध्ये जावयाच्या न्यायासाठी सासू-सासरे आले पुढे

नक्की वाचा - Meerut Crime : 'आमच्या लेकीला फाशीच द्या'; मेरठमध्ये जावयाच्या न्यायासाठी सासू-सासरे आले पुढे

प्रशासनावरती उत्तम पकड असणारा नेता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अवघा महाराष्ट्र पाहतो. मात्र त्यांच्याच बारामती शहरातील नगर परिषदेचा कर्मचारी एवढं मोठं धाडस करतो आणि बांधकाम व्यावसायिकांना लाखो रुपयांची लाच मागतो हे पाहून मात्र आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: