जाहिरात

Virar Crime: डबल मर्डरने विरार हादरलं! लग्न ठरवायला गेला, दोघांना संपवून आला, भयंकर घटना

हिंसक वळणावर गेला आणि शिवमने चाकूने नॅन्सी व तिची आई सरिता यांच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला.

Virar Crime: डबल मर्डरने विरार हादरलं! लग्न ठरवायला गेला, दोघांना संपवून आला, भयंकर घटना

मनोज सातवी, विरार:

Virar Crime:  प्रेम प्रकरणावरुन झालेल्या दुहेरी हत्याकांडाने विरार हादरुन गेले आहे. विरार शहरात बुधवारी दुपारी थरारक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधांतील तणाव इतका टोकाला गेला की एका तरुणाने प्रेयसी आणि तिच्या आईचा निर्दयी खून करत स्वतःवरही वार करुन घेतले. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा 'घरवापसी'चा निर्णय! शिवसेनेत करणार प्रवेश

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नालासोपारा पूर्वेतील २७ वर्षीय शिवम उपाध्याय आणि विरारच्या गोकुळ टाऊनमधील २४ वर्षीय नॅन्सी मिश्रा यांच्यात गेली दोन वर्षे प्रेमसंबंध होते. दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू असतानाच नॅन्सीची आई सरिता मिश्रा यांचा या नात्याला ठाम विरोध होता. मंगळवारी रात्री दोन्ही कुटुंबांमध्ये झालेल्या बैठकीतही लग्नाला नकार देण्यात आला आणि इथूनच या घटनेची ठिणगी पेटली.

बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संतापलेल्या शिवमने ‘पुनम आकांक्षा' इमारतीत जाऊन पुन्हा वाद उकरून काढला. क्षणातच वाद हिंसक वळणावर गेला आणि शिवमने चाकूने नॅन्सी व तिची आई सरिता यांच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला.

 प्रेयसी आणि तिच्या आईची हत्या केल्यानंतर शिवमणे स्वतःच्या गळ्यावरही ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना खबर दिली. बोलींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले, तर गंभीर जखमी शिवमला प्रथम संजीवनी रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती बोलींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण वसई-विरार परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून, पुढील तपास बोलींज पोलीस करत आहेत.

(नक्की वाचा-  Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com