मनोज सातवी
विरार पश्चिमेला असलेल्या अर्नाळा गावातील बंदरपाडा परिसरात गोवारी कुटुंब राहातं. सोमवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास या कुटुंबावर प्राणघातक हल्ल्या झाला होता. या प्रकरणी क्राईम ब्रांचच्या युनिट 3 च्या पथकाने आरोपीला 72 तासात गजाआड केले आहे. दीपेश अशोक नाईक असं या आरोपीचं नाव असून त्याचं वय 29 वर्षे आहे. ज्यावेळी त्याची चौकशी करण्यात आली त्यावेळी त्याने हा हल्ला का केला याचा धक्कादायक खुलासा त्याने केल्या आहे. त्याच्या खुलाशामुळे पोलीसही हैराण झाले आहेत.
आरोपी दीपेश नाईक याच्यावर ऑनलाईन गेमिंग मधून 40 लाखांचे कर्ज झाले होते. त्याने कर्जबाजारी पणातून चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याची आरोपीने कबुली दिली आहे. मात्र त्याने चोरीसाठी घरात प्रवेश केल्यानंतर घरातील लोकांनी आरडा ओरडा केला. त्यामुळे आता आपण पकडले जाऊ अशी त्याला भिती वाटली. त्यामुळे त्याने पकडले जावू नये म्हणून चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याने घटना स्थळावरून पळ काढला अशी कबुली त्याने दिली आहे. गुन्हा केल्यानंतर जवळपास 72 तासांच्या आत आरोपीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
नक्की वाचा - Kadam vs Parab: योगेश कदम यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार? घायवळ प्रकरण भोवणार
या हल्ल्यात जगन्नाथ गोवारी 76, आई लीला गोवारी 72 आणि बहीण नेत्रा गोवारी 52 हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे आरोपी अशोक दीपेश नाईक हा अर्नाळा गावचा रहिवासी आहे. याशिवाय तो दक्षिण मुंबईत एका एन्स्टिट्यूटमध्ये सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होता. क्राईम ब्रांच युनिट 3 चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या पथकाने CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी दीपेश अशोक नाईक (29) याला मुंबईतून अटक केली आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली आहे.