
कुख्यात गुंड निलेश घायवाळचा भाऊ सचिन घायवाळ यांला बंदूकीचा परवाना दिल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. परवाना देण्याची शिफारस ही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली होती. त्यामुळे हे संपुर्ण प्रकरण आता त्यांच्यावरच शेकत आहे. शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमीक घेत या संपुर्ण गोष्टीला योगेश कदम हेच जबाबदार असून त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. राजीनामा दिला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. योगेश कदम हे अडचणीत सापडले असल्याने आता त्यांचे वडील शिवसेना नेते रामदास कदम त्यांच्यासाठी पुढे सरसावले आहेत.
अनिल परब ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, त्यानुसार ते आपल्याला आणि मुलगा योगेश कदमला टार्गेट करत आहेत असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. आपल्या कुटुंबाला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचं ही ते म्हणाले. सचिन घायवाळ याला बंदुक परवाना देण्याबाबतही कदम यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. घायवळ याला परवाना देण्यासाठी एक बड्या नेत्याने दबाव टाकला होता. त्यांच्या सांगण्यावरूनच हा परवाना देण्यात आला असा गौप्यस्फोट ही कदम यांनी केला आहे. पण हा बडा नेता कोण हे मात्र सांगण्याचे कदम यांनी सांगितले.
नक्की वाचा - Kadam vs Parab: योगेश कदम यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार? घायवळ प्रकरण भोवणार
मी आज कुणाचेही नाव घेणार नाही. पण गृहराज्यमंत्र्याच्या कारभारात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. त्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं ही रामदास कदम यांनी यावेळी सांगितलं.दरम्यान या बड्या नेत्यांनी शिफारस केल्याची बाबत फडणवीसांच्या कानावर घातली होती असा दावाही रामदास कदम यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आपण मंत्रीपदावर बसल्यापासून एकाही गुन्हेगार व्यक्तीला बंदुक परवाना दिला नाही असा दावा योगेश कदम यांनी केला आहे. शिवाय सचिन घायवळवर कोणताही गुन्हा नव्हता. त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे असं सांगत त्यांनी आपल्या निर्णयाचा बचाव केला.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्याकडून सभापती राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार रोहित पवार यांनी सभापती राम शिंदे यांचे निलेश घायवळ सोबत जिव्हाळ्याचे संबध आहेत असा आरोप केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिवाय घायवळसाठी शिफारस करणारा तो नेता कोण याकडे ही रोहीत पवार यांनी बोट दाखवले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रामदास कदम म्हणत असलेला तो बडा नेता कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world