मनोज सातवी, प्रतिनिधी
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. त्यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरार पूर्वेच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीची एक बाजू कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या चार मजली इमारतीमध्ये बारा कुटुंब राहत होती. त्यापैकी नऊ जणांना डिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर 20 ते 25 जण इमारतीच्या ढिगार्याखाली अडकलेल्याची भीती व्यक्त होत आहे. 12 ते 15 वर्षात बांधलेलल्या इमारती कोसळतात यावरून त्यांच्या दर्ज्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
इमारतीखाली अडकलेल्या नागरिकांच्या शोधासाठी डॉग स्कोड
विरार पूर्वेच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा एक भाग कोसळला. यानंतर ढिगाऱ्याखालून 9 जणांना बाहेर काढण्यात आलं. मात्र ढिगार्याखाली आणखी काही नागरिक अडकले असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांकडून डॉग स्कॉड अर्थात प्रशिक्षित श्वान आणले आहेत.
नक्की वाचा - Vaishnav Devi landslide: वैष्णो देवी मार्गावर मोठी दरड कोसळली, 5 ठार, 14 जखमी, यात्रा थांबली
दरम्यान स्थानिक आमदार राजन नाईक यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.