
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. अनेक भागांत पूर आला आहे. दुसरीकडे, वैष्णो देवीच्या यात्रेच्या मार्गावर मोठी दरड कोसळली आहे. या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला असून, 14 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूस्खलनामुळे वैष्णो देवीची यात्रा थांबवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्द्धकुमारीजवळ दरड कोसळल्याने काही लोक जखमी झाले. तिथे बचावकार्य सुरू आहे. खराब हवामानामुळे वैष्णो देवीची यात्रा स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने दिली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकड्यांवर असलेल्या माता वैष्णो देवी मंदिराच्या मार्गावर मंगळवारी दुपारी भूस्खलन झाले. या अपघातात अनेक जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर प्रसिद्ध मंदिराची तीर्थयात्रा थांबवण्यात आली आहे. अर्द्धकुमारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ दुपारी 3 वाजता भूस्खलन झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डोंगरावर असलेल्या मंदिराकडे जाणाऱ्या 12 किलोमीटरच्या वळणावळणाच्या मार्गावर साधारणपणे अर्ध्या वाटेवर ही घटना घडली.
Thane Metro ठाणे मेट्रोची प्रतीक्षा संपली! 'या' 10 स्टेशनवरून धावणार मेट्रो, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन कोणतं?
हिमकोटी मार्गावरील यात्रा सकाळपासूनच स्थगित करण्यात आली होती. पण दुपारी 1.30 वाजेपर्यंत जुन्या मार्गावरील यात्रा सुरू होती. मात्र, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत या मार्गावरील यात्राही स्थगित करण्याचा निर्णय घेतला. डोडा येथे ढगफुटीमुळे तवी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. सततच्या जोरदार पावसामुळे जलाशयांमध्ये पाणी साचल्याने चौथ्या तवी पुलाजवळील रस्ता वाहून गेला आहे. डोडा येथे पाऊस आणि पुरामुळे 4 लोकांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.
नक्की वाचा - Pune News: पुण्याच्या 'या' डॉक्टरांचे चाहते झाले आनंद महिंद्रा, कारण ही आहे खास
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक भागांतील घरांचे आणि इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. बचाव व मदतकार्य सुरू आहे. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना, विशेषतः सखल आणि डोंगराळ भागांत राहणाऱ्या लोकांना, थांबून-थांबून होत असलेल्या पावसामुळे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world