जाहिरात

Al Qaeda: अल कायदाची ही आहे भारतातील मास्टरमाइंड, शमाचं काय आहे पाकिस्तान कनेक्शन

एटीएसनुसार, शमा परवीनने अल-कायदाच्या मौलाना असिम उमर, अन्वर अल-अवलाकी आणि लाहोरमधील लाल मशीदचे मौलाना अब्दुल अझीझ यांच्या भडकाऊ व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

Al Qaeda: अल कायदाची ही आहे भारतातील मास्टरमाइंड, शमाचं काय आहे पाकिस्तान कनेक्शन

गुजरात एटीएसने (ATS) प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) शी संबंधित सोशल मीडिया प्रचार प्रकरणी एका महिलेला अटक केली आहे. या महिलेचं नाव शमा परवीन असून ती अल-कायदाची मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं आहे. ती मूळची झारखंडची असली तरी सध्या बेंगळुरूमधील आरटी नगर परिसरात राहत होती. जिथून एटीएसने तिला अटक केली. तिच्या अटकेने एकच खळबळ उडाली असून अल कायदा भारतात आपले पाय पसरत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शमा परवीन कोण आहे?
शमा परवीन ही अल-कायदाची एक प्रमुख सदस्य आहे. तिच्यावर सोशल मीडियावर जिहादी प्रचार करण्याचा आरोप आहे. ती यासाठी तरुण-तरुणींना लक्ष्य करत होती. एटीएसला काही काळापासून सोशल मीडियावर कट्टरपंथी मजकूर (content) पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश मिळाले होते. याच अंतर्गत एटीएसच्या एका विशेष टीमने अनेक सोशल मीडिया खाती शोधली, जी जिहाद, गझवा-ए-हिंद आणि भारत सरकारविरोधी हिंसा भडकवणारे संदेश प्रसारित करत होती.

नक्की वाचा - Beed Political News : पंकजा मुंडेंना धक्का; 35 वर्ष सोबत असलेला नेता अजित पवारांसोबत जाणार

शमा जिहादी प्रचार कसा करत होती?
“Strangers of The Nation” आणि “Strangers of The Nation 2” नावाच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून सातत्याने दहशतवादी विचारसरणीचा प्रसार केला जात होता. या खात्यांवरून अल-कायदाच्या नेत्यांचे व्हिडिओ आणि भडकाऊ भाषणे शेअर केली जात होती. ज्यानंतर एटीएस सतर्क झाली. शमा परवीनचं पाकिस्तान कनेक्शनही समोर आलं आहे. ती AQIS चा प्रमुख मौलाना असीम उमर ऊर्फ सनाउल हक याच्या प्रभावाखाली होती. मौलाना असीम उमरची भडकाऊ विधाने ती सोशल मीडियावर सतत पोस्ट करून लोकांचं ब्रेनवॉश करत होती.

मौलाना असीम उमर ऊर्फ सनाउल हक कोण होता?
2014 मध्ये अल-कायदाचा प्रमुख अल-जवाहिरीने मौलाना असीम उमरला AQIS चा प्रमुख बनवले होते. मौलाना असीम उमर मूळचा उत्तर प्रदेशातील संभळचा होता, जो 90 च्या दशकात पाकिस्तान आणि नंतर अफगाणिस्तानला गेला. 2019 मध्ये अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्याने असीम उमरला ठार केले होते. तरीही असीम उमरची विधाने आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. ती लोकांना दहशतवादी बनण्यास प्रवृत्त करतात. शमासह नोएडा, दिल्ली आणि गुजरातमधून अटक करण्यात आलेले दहशतवादी मौलाना असीम उमरची विधाने केवळ ऐकतच नव्हते, तर सोशल मीडियावर सतत शेअर करत होते.

नक्की वाचा - Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार, विशेष मकोका कोर्टाचं निरीक्षण

एटीएसची टीम शमापर्यंत कशी पोहोचली?
एटीएसने सर्वप्रथम अहमदाबाद, मोरबी, दिल्ली आणि नोएडा येथून चार जणांना पकडले. त्यांच्या चौकशीतून आणि डिजिटल पुराव्यांच्या तपासणीतून शमा परवीनचं नाव समोर आलं. ती या खात्यांची खरी वापरकर्ता (user) होती. त्यानंतर गुजरात एटीएसची टीम बेंगळुरूला पोहोचली. 29 जुलै रोजी स्थानिक पोलीस आणि केंद्रीय एजन्सींच्या मदतीने शमा परवीनला अटक केली. प्राथमिक तपासणीत तिच्या मोबाईल फोनमधून अनेक व्हिडिओ आणि पोस्ट सापडल्या आहेत. ज्यात जिहादी भाषणे, भारतविरोधी विधाने आणि तरुणांना हिंसेसाठी भडकावण्याच्या प्रयत्नांचे पुरावे आहेत. 

शमा चौकशीच्या फेऱ्यात 
एटीएसनुसार, शमा परवीनने अल-कायदाच्या मौलाना असिम उमर, अन्वर अल-अवलाकी आणि लाहोरमधील लाल मशीदचे मौलाना अब्दुल अझीझ यांच्या भडकाऊ व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या व्हिडिओमध्ये शस्त्रे उचलणे, सरकारविरोधात युद्ध छेडणे आणि देशात जातीय तणाव पसरवण्याबद्दल बोललं गेलं होतं. शमा परवीनविरोधात यूएपीए (UAPA) आणि भारतीय न्याय संहितेच्या (Bharatiya Nyaya Sanhita) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिची चौकशी सुरू असून तिच्या सोशल मीडिया खाती, ईमेल आणि परदेशी संपर्कांचीही सखोल चौकशी केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com