जाहिरात

Mumbai News: आरोग्य विभागाला मिळणार बुस्टर डोस! राज्य सरकारचा जागतिक संस्थांसोबत महत्त्वपूर्ण करार

Mumbai News: आरोग्य विभागाला मिळणार बुस्टर डोस! राज्य सरकारचा  जागतिक संस्थांसोबत महत्त्वपूर्ण करार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दोन जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI) व इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अ‍ॅण्ड मिनिमल अ‍ॅक्सेस सर्जरी ट्रेनिंग (IMMAST) या संस्थांसोबत झालेल्या या करारामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला प्रशिक्षण, संशोधन आणि धोरणनिर्मितीच्या दिशेने एक नवी गती मिळणार आहे.

BMC Recruitment: मुंबई महापालिकेमध्ये बंपर भरती! अनुपस्थित विद्यार्थ्यांना 'या' तारखेला शेवटची संधी

PHFI सोबतचा करार – धोरण, संशोधन आणि प्रशिक्षणासाठी सहयोग
राज्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना क्षमता वृद्धी प्रशिक्षण
सार्वजनिक आरोग्य धोरण, प्रशिक्षण धोरण आणि तांत्रिक सहकार्य यासाठी PHFI कडून मार्गदर्शन

आरोग्य प्रणाली व धोरणांवर आधारित संशोधन, नवतंत्रज्ञान आणि अंमलबजावणी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ महाराष्ट्रात स्थापन होण्याची शक्यता
 5 वर्षांचा करार, परस्पर सहमतीने आणखी 5 वर्षे वाढवण्याची तरतूद

PHFI ने भारतभरात 583 जिल्ह्यांत कार्य करत 45000 हून अधिक आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षित केले असून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

IMMAST सोबतचा करार – परिचारिकांसाठी व्यावहारिक प्रशिक्षणाचा नवा टप्पा
पुढील 3 वर्षांत 1000 परिचारिकांना व आरोग्यसेवा व्यावसायिकांना अद्ययावत प्रशिक्षण
 राज्यात 'मास्टर ट्रेनर्स' तयार करून प्रशिक्षणाची सातत्यपूर्ण व्यवस्था उभारण्याचा उद्देश
3 वर्षांचा करार; आवश्यकतेनुसार विस्तार

Devendra Fadnavis: उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार

IMMAST ही संस्था अतिदक्षता, शस्त्रक्रिया व परिचर्या क्षेत्रात सिम्युलेशन आधारित प्रशिक्षणासाठी ओळखली जाते. या संस्थेने आतापर्यंत 25000 हून अधिक डॉक्टर व परिचारिकांना 23 सुपर स्पेशालिटी विभागांत प्रशिक्षण दिले असून, 35 देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले की, या दोन्ही सामंजस्य करारामुळे आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल तसेच नर्सिंग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेल. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com