Who is Mateen Patel? : सकाळी 6 वा. पालिकेकडून घरावर बुलडोझर, निदा खानला आश्रय; संभाजीनगरचे मतीन पटेल कोण आहेत?

मतीन पटेल यांचं घर नाल्याच्याजवळ आहे. जे अनधिकृत आहे. त्यामुळे या घरावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar News : नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय देणारे छत्रपती संभाजीनगरचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर आणि कार्यालयावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. १३ मे रोजी सकाळी ६ वाजता मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. मतीन पटेल यांचं घर नाल्याच्याजवळ आहे. जे अनधिकृत आहे. त्यामुळे या घरावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.


कोण आहे मतीन पटेल? Who is Mateen Patel?

मतीन पटेल हे AIMIM पक्षाचे नेते आहेत. ते छत्रपती संभाजीनगरचे नगरसेवक आहेत. मतीन पटेल इम्पियाज जलील यांच्या जवळचे असल्याचं मानले जातात. मतीन पटेल यांच्यावर नाशिक टिसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना आश्रय दिल्याचा आरोप आहे. नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण प्रकरणात निदा खानचं नाव समोर आल्यानंतर पोलीस तिच्या मागावर होते. मात्र तब्बल २५ दिवस निदा खान बेपत्ता होती. यादरम्यान ती संभाजीनगरमध्ये नगरसेवक मतीन पटेल याच्या आश्रयास होती अशी माहिती आहे. दरम्यान आज १३ मे, बुधवारी मतीन पटेल याच्या बेकायदेशीर घर आणि कार्यालयावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. दरम्यान, ८ मे, शुक्रवारी मतीन पटेल यांना पोलिसांची चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, पटेल यांच्यावर 'भारतीय न्याय संहिता' च्या कलम २४९ अंतर्गत एखाद्या आरोपीला कायदेशीर कारवाईपासून वाचवण्यासाठी मदत करण्याचा आरोप आहे.

Advertisement

नक्की वाचा - इंधन दरवाढीचा परिणाम थेट जनावरांच्या बाजारावर; बैलजोड्यांचे दर ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली


निदा खान कोण आहे?

नाशिक टिसीएस बीपीओ युनिटमध्ये निदा खान टेलिकॉलर म्हणून काम करीत होती. तिच्यावर विविध प्रकारचे आरोप आहे. 
- धार्मिक भावना दुखावणे
- धर्मांतरणासाठी प्रोत्साहन देणं
- पीडितांना तक्रार दाखल करण्यापासून परावृत्त करणे
- लैंगिक छळ आणि शोषणाच्या कथित प्रकरणांमध्ये आरोपींना मदत करणे.