पुतणीवर जडले प्रेम, भडकलेल्या पत्नीने शिकवला धडा; मात्र ड्रामा इथेच संपला नाही

पती घरी आल्यानंतर डायेनने त्याच्याशी गोड-गोड बोलून त्याला पलंगापर्यंत नेले आणि पलंगावर झोपवून त्याला बांधून ठेवले. यानंतर तिने लाइट बंद केले आणि पुढे...

Advertisement
Read Time: 2 mins

पतीवर संतापलेल्या एका पत्नीने त्याला भयंकर पद्धतीने धडा शिकवला. या पत्नीने पतीचे रेझरने गुप्तांग कापले आणि ते कमोडमध्ये टाकून फ्लश केले. या प्रकरणी पत्नीला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र हे नाट्य इथेच थांबलेलं नाही. या नाट्यामध्ये वळण येणे बाकी होते. 

'मिरर' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,  हे प्रकरण जेव्हा कोर्टामध्ये पोहोचले तेव्हा या घटनेचे एक-एक तपशील समोर येण्यास सुरुवात झाली. सरकारी पक्षाने सांगितले की आरोपी डायेन डोस सेंटोस फारियाने आपला गुन्हा कबूल केला आहे. कोर्टामध्ये तिने सांगितले की तिने तिच्या पतीला शारीरिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावले होते. डिसेंबर 2023मध्ये ही घटना घडली आहे.  

(नक्की वाचा : दारूच्या नशेत आईला केली शिवीगाळ, मित्रांचा झाला संताप; अन्...)

गोड-गोड बोलून पतीला शिकवला धडा

पती घरी आल्यानंतर डायेनने त्याच्याशी गोड-गोड बोलत त्याला पलंगापर्यंत नेले आणि पलंगावर झोपवून त्याला बांधून ठेवले. यानंतर तिने लाइट बंद केले. यानंतर डायेनने पतीचे लिंग कापले आणि ते कमोडमध्ये टाकले. गिल्बर्टो असे डायेनच्या पतीचे नाव आहे. डायेनने असे राक्षसी पाऊल का उचलले? याचाही खुलासा खटल्यादरम्यान झाला. 

(नक्की वाचा: सात वचनांचा पतीला पडला विसर, जेवणावरून पत्नीसोबत कडाक्याचे भांडण; रागाने गाठले टोक)

पत्नीला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा

लिंग कापल्याच्या घटनेनंतर गिल्बर्टो आणि डायेनने एकमेकांना माफ केले आहे. गिल्बर्टोनेच डायेनच्या न्यायालयीन लढाईसाठीचा खर्च उचलला. 15 मे रोजी न्यायाधीशांनी डायेनला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गिल्बर्टो पेट्रोल पंपवर काम करतो. त्याने या दुर्घटनेनंतर खोटे लिंग लावून घेतले आहे. त्याने घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत म्हटले की, "सर्व चूक माझीच आहे. माझे माझ्या पुतणीसोबत प्रेमसंबंध असून मी पत्नीची फसवणूक करायला नको होती. डायेन ही खूप चांगली आहे. तिचे माझ्यावर खूप प्रेम होते".

(नक्की वाचा: मुंबईतील बड्या उद्योजकाला पोलिसानेच घातला 25 लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?)

VIDEO: Lok Sabha | मिहीर कोटेचांचं कार्यालय फोडलं, 20-25 जणांविरोधात गुन्हा दाखल

Topics mentioned in this article