मोसीन शेख, छत्रपती संभाजीनगर
प्रियकराच्या मदतीन पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. शहरातील हडको परिसरात असलेल्या स्केटिंग ग्राउंडवर शनिवारी सकाळी हत्येची एक घटना उघडकीस आली होती. गणेश दराखे या व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला होता. सिडको पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात या खुनाचा उलगडा केला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीसह 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रुपाली गणेश दराखे असे सुपारी देण्याऱ्या पत्नीचे नाव असून सुपडू गायकवाड असे या प्रियकराचे नाव आहे. रुपालीने आपला प्रियकर सुपडूला दोन लाख रुपयात नवऱ्याचा काटा काढण्याची सुपारी दिली होती. तर यात अमोल चिंतामण चौधरी, अजय दिलीप हिवाळे आणि अनिकेत चौथे असे सुपारी घेणाऱ्या तिघांचे नाव आहे. या पाचही आरोपींना गुन्हे शाखेने आणि सिडको पोलिसांनी अटक करत त्यांच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, याबाबत अधिक माहिती आज पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश आणि त्याची पत्नी रुपाली यांच्यात वाद सुरु होते. मागील 5 वर्षांपासून दोघेही वेगळे राहत होते. मागील दोन महिन्यांपासून दोघे पुन्हा एकत्र राहू लागले होते. गणेश याला एका जमिनीच्या व्यवहारातून 21 लाख रुपये मिळाले होते. याच पैशातून सुपारी देऊन पत्नी रुपालीने गणेशचा काटा काढला.
(नक्की वाचा- किराणा दुकानात सुरू होती भलत्याच मालाची विक्री, धाडीनंतर पोलीसही चक्रावले)
पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांकडे विचारपूस केली होती. त्यांच्याकडून दोघांमध्ये वाद असल्याची माहिती मिळाली. या संशयाच्या आधारावर पोलिसांनी रुपाली हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि गुन्ह्याची कबुली दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world