Beed Crime: बीडमध्ये चाललंय काय? झाड तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला

या प्रकरणात आणखी कोणकोणत्या कारवाया होणार आहेत, पोलिसांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत,  बीड: बीडमधून एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेताच्या बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केल्यावर, एका महिलेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार वडवणी तालुक्यात घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Malegaon Sahakari Sakhar Karkhana : बारामतीच्या सत्ताकेंद्रासाठी काका-पुतणा राजकीय रिंगणात; कोण मारणार बाजी?

समोर आलेल्या माहितीनुसार, देवळा ते कोरडे वस्ती दरम्यान च्या पायवाटेवर गट क्रमांक 202, 203, 205 आणि 251 या शेताच्या बांधावरील तब्बल 80-90 वर्षे जुनी लिंबाची झाडं तोडली जात होती. महिलेनं झाड तोडण्याचा जाब विचारताच, तिला चापट मारून, शिवीगाळ करत रस्ता काढण्याची धमकी देण्यात आली. यावेळी तिचे पती, सासू-सासरे आणि इतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचताच, हातातील काट्यांनी जबर मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी बालकृष्ण शिंदे यांच्यासह १६ जणांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या हक्कावर चाललेली बळजबरी आणि महिलांवरील हिंसाचाराचा हा प्रकार, निश्चितच संतापजनक आहे. या प्रकरणात आणखी कोणकोणत्या कारवाया होणार आहेत, पोलिसांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.

नक्की वाचा - Gold Robbery Case : 35 दिवस उलटले, पण साडेपाच किलो सोनं कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर पोलीस हैराण

Topics mentioned in this article