
Women Kidnapping Viral Video: गरबा खेळण्याची प्रॅक्टिस करत असतानाच एका महिलेचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशमधील मंदसौर येथील खानपुरा येथे ही घटना घडली. गरबा खेळणाऱ्या एका महिलेचे काही पुरूषांनी अपहरण केले. त्यांनी तिला फरफटत नेले. त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Madhya Pradesh Kidnapping Viral Video) व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, खानपुरा येथील भावसार धर्मशाळेत महिला आणि तरुणी गरबा खेळण्याची प्रॅक्टिस करत होत्या. याचवेळी गरबा खेळत असताना चार तरुण आणि दोन महिला आल्या आणि गरबा खेळणाऱ्या महिलेला पकडले आणि तिला ओढून नेण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून उपस्थित असलेले सर्वजण घाबरून गेले, इकडे तिकडे पळाले. त्यातूनही एक तरुणी तिच्या बचावासाठी आली, परंतु आरोपी महिलांनी तिला ढकलले. त्यानंतर त्यांनी महिलेला फरफटत नेले.
बंदूक की नोक पर युवती को उठा ले गए...
— NDTV India (@ndtvindia) September 21, 2025
मध्य प्रदेश के मंदसौर में गरबा प्रैक्टिस कर रही महिला का अपहरण, बंदूक की नोक पर युवती को घसीटते हुए ले गए 6 लोग.
पुलिस ने नाकेबंदी कर सभी को पकड़ लिया . जांच में सामने आया कि महिला अपने शराबी और हिंसक पति से परेशान होकर दूसरे शख्स के साथ… pic.twitter.com/WIeQP8zE07
शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.घटनेनंतर, उपस्थित असलेल्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. तपासणी दरम्यान, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आणि महिलेची सुटका केली. या घटनेत वापरलेले खेळण्यांचे पिस्तूल आणि वाहन जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेबाबत धक्कादायक माहितीही समोर आली.
ही महिला ही महिला आधीच विवाहित होती, परंतु असे असूनही, ती गेल्या चार महिन्यांपासून मंदसौरमधील एका तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. शनिवारी, ती भावसार धर्मशाळेत प्रॅक्टिस करण्यासाठी आली होती, तेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला जबरदस्तीने ओढून नेले. हल्ल्यादरम्यान पिस्तूलसारखी वस्तूही दाखवण्यात आली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world