Shirdi Crime News: अनैतिक संबंधात अडसर; जन्मदात्या आईने प्रियकराच्या मदतीने 4 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं

Shirdi Crime News : निफाड तालुक्यातील साकोरी मिग येथे वास्तव्यास असणाऱ्या कार्तिकच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाचा खून केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, शिर्डी

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने चार वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. जन्मदाती आई आणि तिच्या प्रियकराने ही हत्या केल्याचं पोलीस तपासा उघड झालं आहे.  कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदी पात्रात दीड महिन्यापूर्वी गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह मिळून आला होता. कोपरगाव पोलिसांनी मुलाची आई शितल बदादे आणि तिचा प्रियकर सागर वाघ या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर 2024 रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील नदीपात्रात चार वर्षाच्या चिमुरड्याचा गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले होते. यावेळी मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्हाचा तपास हे पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र कोपरगाव पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने चार वर्षांच्या कार्तिकची ओळख पटवून त्याच्या हत्येच कोड सोडवलं आहे.

(नक्की वाचा-  Saif Ali khan : जलद रिकव्हरी, रिक्षाने प्रवास, हल्ल्याबाबत संशय; सैफ अली खानने लोकांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं दिलं उत्तर)

निफाड तालुक्यातील साकोरी मिग येथे वास्तव्यास असणाऱ्या कार्तिकच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाचा खून केला. त्यानंतर मृतदेह गाठोड्यात बांधून दुचाकीवरुन नेऊन गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. मयत कार्तिकची आई शितल ही पतीपासून वेगळी राहत होती. कार्तिक देखील आईसोबत राहत होता. यादरम्यान तिचे सागर याच्यासोबत प्रेम संबंध जुळले. मात्र कार्तिकचा अडसर निर्माण होत असल्याने दोघांनी त्याच्या हत्येचा प्लॅन केला आणि त्यानुसार चिमुकल्याची हत्या केली. 

Advertisement

(नक्की वाचा- Election Results 2025 Updates: निवडणुकीतील पराभवानंतर 'आप'चं पुढील प्लान काय?)

कार्तिकचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी वडील ज्ञानेश्वर बदादे आले असता त्यांनी आपली बायको शितल व तिच्या प्रियकराबाबत माहिती देत त्यांनीच हत्या केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला, मात्र हत्या झाल्यापासून आरोपी पोलिसांना चकवा देत होते. पोलिसांचा अहिल्यानगरसह नाशिक जिल्ह्यात तपास सुरू असताना सदरची महिला ही दिंडोरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शितलला दिंडोरी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी सागर वाघ याला देखील पोलिसांनी अटक केली. 

Topics mentioned in this article