जाहिरात
5 hours ago
मुंबई:

Delhi Assembly Election Results : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. गेल्या दोन निवडणुकींमध्ये प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीला तिसऱ्यांदा तो चमत्कार करता आलेला नाही. तर भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत 27 वर्षांनी दिल्लीची सत्ता मिळवली आहे. 

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीयांसह आम आदमी पक्षाचे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर गेल्या दोन निवडणुकात एकही जागा न मिळवणाऱ्या काँग्रेसची पाटी पुन्हा एकदा कोरी राहिली आहे. 

Delhi Election Result : 'त्यांचे शॉर्टसर्किट केले....' दिल्लीतील विजयानंतर PM मोदींना दिली 'ही' गॅरंटी

Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता मिळवली आहे. दिल्लीत 1998 नंतर तब्बल 27 वर्षांनी भाजपाला सत्ता मिळाली आहे. या विजयानंतर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. तसंच यापूर्वी दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला केला. 

वाचा पंतप्रधान मोदींनी भाषणात काय सांगितलं - नरेंद्र मोदींची दिल्लीकरांना गॅरंटी

PM Modi Live : दिल्लीला 'आप'दा मधून मुक्त करण्याचं समाधन - PM मोदी

आज दिल्लीतील लोकांमध्ये एक उत्साह आणि समाधान आहे. विजयाचा उत्साह आहे आणि दिल्लीला 'आप'दा मधून मुक्त करण्याचं समाधान आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात केलेल्या भाषणात व्यक्त केली आहे. 

मोदी यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहा

दिल्ली भाजपा कार्यालयात मोदी, मोदीचा जयजयकार! नड्डांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार, Video

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील यशानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा कार्यालयात दाखल झाले आहेत. भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यावेळी उपस्थित आहेत. जेपी नड्डा यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल कार्यकर्त्यांते आभार व्यक्त केले आहेत. 

Election Results 2025 : भाजपा मुख्यालयात अमित शाह आणि नड्डा दाखल, थोड्याच वेळात मोदी येणार! पुढचा मुख्यमंत्री कोण?

दिल्ली विधानसभेत 27 वर्षांनी भाजपानं बहुमत मिळवलं आहे. या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे भाजपाच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी देखील थोड्याच वेळात भाजपा मुख्यालयात येणार आहेत. ते इथं कार्यकर्त्यांना संबोधित करतील. दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

दिल्लीत 27 वर्षांनी भाजपाचे बहुमत, कोण होणार मुख्यमंत्री? 'या' नावांची सर्वाधिक चर्चा

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले असून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आता दिल्लीत भाजपा कुणाला मुख्यमंत्री करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिल्ली भाजपामधील हे नेते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

 वाचा सविस्तर विश्लेषण -  दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'या' नावांची सर्वाधिक चर्चा

Election Results 2025 LIVE Updates: केजरीवाल, सिसोदीयांसह AAP चे 'हे' प्रमुख नेते झाले पराभूत

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या मनिष सिसोदीया यांचाही या निवडणुकीत पराभव झालाय. त्याचबरोबर सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि सत्येंद्र जैन हे पक्षाचे दिग्गज नेत्यांनाही या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. 

Delhi Elections Result 2025: सौरभ भारद्वाज यांचा ग्रेटर कैलास मतदारसंघातून पराभव

'आप'चे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहे. त्यांचे सहकारी गोपाल राय बाबरपूर मतदारसंघातून विजयी झाले.

Delhi Elections Result 2025: "जनतेचा निर्णय आहे मी नम्रतेपणे स्वीकारतो...", पराभवानंतर केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजपचं अभिनंदन केले. "जनतेचा जो काही निर्णय आहे तो मी नम्रतेपणे स्वीकारतो. भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन. भाजप जनतेच्या आशा आणि अपेक्षांवर खरा उतरेल अशी अपेक्षा आहे."

PM Modi Tweet : "विकास आणि सुशासन जिंकलं", दिल्लीतील विजयावर PM नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

"विकास आणि सुशासन जिंकलं", दिल्लीतील विजयावर PM नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

Delhi Elections Result 2025: मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांचा पराभव

अरविंद केजरीवाल यांचा पराभव, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या परवेश सिंह यांनी केला पराभव, जवळपास 1200 मतांनी पराभव

Delhi Elections Result 2025: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा पराभव

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा पराभव, जंगपुरा मतदारसंघातून भाजपच्या तरविंदर मारवार यांनी केला पराभव

Delhi Elections Result 2025: 'आप'च्या 36 विद्यमान आमदारांपैकी 21 आमदार पिछाडीवर

दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला जवळपास नाकारले आहे. 10 वर्षांच्या सत्तेनंतर दिल्लीत 'आप' सत्तेतून बाहेर जाताना दिसत आहे. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्यासह अनेक मंत्री पिछाडीवर पडले आहे.दिल्लीतील 'आप'च्या 36 विद्यमान आमदारांपैकी 21 आमदार पिछाडीवर आहेत.

Delhi Elections Result 2025: नवी दिल्ली मतदारसंघात उलटफेर, केजरीवाल पुन्हा पिछाडीवर

नवी दिल्ली मतदारसंघात उलटफेर, केजरीवाल पुन्हा पिछाडीवर, परवेश सिंह 300 हून अधिक मतांनी आघाडीवर

Delhi Elections Result 2025: भाजप-आपमध्ये अटीतटीची लढत

Delhi Elections Result 2025: भाजप-आपमध्ये अटीतटीची लढत

भाजप-आपमध्ये अटीतटीची लढत

23 जागांवर मतांचं अंतर 2000 मतांहून कमी

10 जागांवर मतांचं अंतर 1000 हून कमी

दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन

दिल्लीतील कलांनंतर भाजपमध्ये आनंदाची लाट. दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन. 

Delhi Elections Result 2025: दिल्लीच्या कलांमद्ये ट्विस्ट? 'आप' वापसी करणार, भाजपची आघाडी घटली

Delhi Elections Result 2025: दिल्लीच्या कलांमद्ये ट्विस्ट? 'आप' वापसी करणार, भाजपची आघाडी घटली

Delhi Elections Result 2025: दिल्लीमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेला, संजय राऊत यांची टीका

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कमबॅकबद्दल शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपने केजरीवाल सरकारला दिल्लीत ५ वर्षे काम करू दिले नाही. गुजरातमधून आणलेल्या उपराज्यपालांना सर्व अधिकार दिले. त्यांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले. त्यांनी महाराष्ट्र, दिल्लीमध्ये हा फॉर्म्युला वापरला, आता बिहारमध्ये निवडणुका आहेत, कदाचित ते त्यातही असेच करतील. नेतृत्व संपवण्याचा हा महाराष्ट्राचा पॅटर्न आहे. महाराष्ट्र, हरियाणामध्येही हेच घडले.

केजरीवाल यांच्या कारभाराला जनतेने उत्तर दिलं- सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार : "आनंदाची बाब आहे, गेले दहा वर्ष ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये केजरीवालांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासामध्ये एक बाधा ठरणारा होता. आता देशाची राजधानी दिल्ली प्रगतीपथावर जाईल आणि केजरीवाल यांच्या कारभाराला जनतेने उत्तर दिलं आहे. 

दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना कालकाजी मतदारसंघातून 1100 मतांनी पिछाडीवर

दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना कालकाजी मतदारसंघातून 1100 मतांनी पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आघाडीवर

आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पहिल्यांदा आघाडीवर, 254 मतांनी केजरीवाल आघाडीवर, आतिशी मार्लेना आणि मनिष सिसोदिया अजूनही पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: तीन दशकांनंतर दिल्लीत भाजपचं कम बॅक, कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

तीन दशकांनंतर दिल्लीत भाजपचं कम बॅक, कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, भाजप 42, आप 27 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर

Delhi Elections Result 2025: दिल्ली धक्का, आपच्या मुंबईतील कार्यालयात शुकशुकाट

दिल्लीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मुंबईतील आप प्रदेश कार्यालयासमोर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अंधेरीतील आप प्रदेश कार्यालय येथे एकही आपचा कार्यकर्ता फिरकला नाही.

Delhi Elections Result 2025: निवडणूक आयोगाच्या कलांनुसारही भाजपला स्पष्ट बहुमत

निवडणूक आयोगाच्या कलांनुसारही भाजपला स्पष्ट बहुमत

Delhi Elections Result 2025: अरविंद केजरीवाल आणि परवेश साहेब सिंह यांच्यात अटीतटीची लढत

अरविंद केजरीवाल आणि परवेश साहेब सिंह यांच्यात अटीतटीची लढत, परवेश अवघ्या 75 मतांनी आघाडीवर

"और लढो आपस मैं", ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत आप, काँग्रेसचे कान टोचले

"और लढो आपस मैं", ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत आप, काँग्रेसचे कान टोचले

Delhi Elections Result 2025: कल कायम राहिल्यास भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार

कल कायम राहिल्यास भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार, आपचा परिभव निश्चित

आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना हे दोघेही पिछाडीवर

आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना हे दोघेही पिछाडीवर आहे. मनिष सिसोदिया देखील पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांचे कल हाती

दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांचे कल हाती, भाजप 44 जागांवर आघाडीवर, आप 25 जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर

Delhi Elections Result 2025: पहिल्या एका तासात मतमोजणीत भाजपचा बोलबाला

पहिल्या एका तासात मतमोजणीत भाजपचा बोलबाला, भाजप 42 जागांवर आघाडीवर, आप 25 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर

Delhi Elections Result 2025: भाजप आणि आपमधील अंतर वाढलं, भाजप ८ जागांवर आघाडीवर

भाजप आणि आपमधील अंतर वाढलं, भाजप ८ जागांवर आघाडीवर

Delhi Elections Result 2025: अरविंद केजरीवाल अजूनही पिछाडीवर

अरविंद केजरीवाल अजूनही पिछाडीवर, आतिशी मार्लेना, मनिष सिसोदिया देखील पिछाडीवर, परवेश साहेब सिंह नवी दिल्ली मतदारसंघातून आघाडीवर

Delhi Elections Result 2025: भाजपला सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, आप पिछाडीवर

भाजपला सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, आप पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: भाजप किमान 50 जागांवर विजयी होणार, भाजप नेते मंजिंदर सिंग यांचा दावा

भाजप किमान ५० जागांवर विजयी होणार, भाजप नेते मंजिंदर सिंग यांचा दावा

Delhi Elections Result 2025: आम आदमी पक्षाचे टॉप 3 नेते पिछाडीवर

आम आदमी पक्षांचे टॉप 3 नेते पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: भाजप सुरुवातीच्या कलांत 28 जागांवर आघाडीवर

भाजप पुन्हा आघाडीवर, भाजप २८, आप २४, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर

Delhi Elections Result 2025: सुरुवातीच्या कलात आप पहिल्यांदा आघाडीवर, आप 22 जागांवर पुढे

सुरुवातीच्या कलात आप पहिल्यांदा आघाडीवर, आप २२ जागांवर, भाजप १९ तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर

Delhi Elections : दिल्ली पोस्टल मतमोजणीत भाजप आघाडीवर, आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात

दिल्ली पोस्टल मतमोजणीत भाजप आघाडीवर, आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात

Delhi Elections Result 2025: भाजप 13 जागांवर आघाडीवर, तर आप 10 जागांवर आघाडीवर

पोस्टल मतमजोणीत भाजप १३ जागांवर आघाडीवर, आप १० जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर

Delhi Elections Result 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी मार्लेना पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी मार्लेना पिछाडीवर 

 भाजप 9 जागांवर आघाडीवर, तर आप 7 जागांवर आघाडीवर

Delhi Elections Result 2025: अवध ओझा पटपडगंज मतदारसंघातून पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: अवध ओझा पटपडगंज मतदारसंघातून पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: मनिष सिसोदिया जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: मनिष सिसोदिया जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल पिछाडीवर

नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल पिछाडीवर

Delhi Elections Result 2025: सुरुवातीच्या कलात भाजप आघाडीवर

भाजप आघाडीवर, भाजप ६ तर आप २ जागेवर आघाडीवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर

Delhi Elections Result 2025: सुरुवातीच्या कलात भाजप आघाडीवर

सुरुवातीच्या कलात भाजप आघाडीवर, भाजप 5 तर आप 1 जागेवर आघाडीवर

Delhi Elections Result 2025: दिल्लीत भाजप 50 पेक्षा जास्त जागा जिंकेल : खुराणा

मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मोतीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरीश खुराणा यांनी मोठा दावा केला आहे. भाजपचा झेंडा केवळ मोतीनगरमध्येच नव्हे तर संपूर्ण दिल्लीत फडकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दिल्लीत भाजप 50 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा आम्हाला विश्वास आहे खुराणा यांनी व्यक्त केला.

Delhi Elections : मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था

दिल्लीत मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या दोन तुकड्या, डीसीपी, अतिरिक्त डीसीपी, एसीपी आणि निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थाही चोख आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी  ड्रोनचाही वापर करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Delhi Election : एक्झिट पोलनुसार आपला धक्का, भाजपची मुसंडी

दिल्ली विधानसभेच्या आठ एक्झिट पोल्समध्ये भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिल्लीत सत्ता मिळण्यासाठी 36 जागांची गरज आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या सर्व एक्झिट पोल्सच्या आधारे NDTV वर पोल्स ऑफ पोल्स देण्यात आला आहे. त्यानुसार आम आदमी पक्षाला 18-25, भाजपाला 42-50 आणि काँग्रेसला 0 - 2 जागा मिळतील असा अंदाज आहे.

Delhi Elections Result : मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्ववस्था

मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. शिवाय ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणीही तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांवरिल मतमोजणी सकाळी 7 वाजता सुरू होणार

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांवरिल मतमोजणी सकाळी 7 वाजता सुरू होईल. सर्वात आधी पोस्टल मतमोजणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी केली जाईल.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: