जाहिरात

Pandharpur News: पंढरपुरात खळबळ! बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने संपवलं आयुष्य

Pandharpur News: पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

Pandharpur News: पंढरपुरात खळबळ! बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने संपवलं आयुष्य

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा उत्साह आणि विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांचा जनसागर उसळला असतानाच एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्ताला आलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) जवानाने स्वतःवर बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केली.

पहाटेच्या सुमारास झाडल्या गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जवानाचे नाव रामेश्वर ध्रुपद साबणे असे आहे. आषाढी वारीतील गर्दी आणि सुरक्षा लक्षात घेता SRPF ची तुकडी पंढरपुरात तैनात करण्यात आली होती. शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास, जेव्हा मंदिरात विठ्ठलाची शासकीय महापूजा सुरू होती, त्याच सुमारास रामेश्वर साबणे यांनी आपल्या सेवा सस्त्रातून स्वतःवर गोळ्या झाडल्या. गोळीचा आवाज ऐकून सहकारी जवानांनी तात्काळ धाव घेतली, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

जवानाने हे टोकाचे पाऊल नक्की कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एकादशीच्याच दिवशी आणि विठुरायाच्या महापूजेच्या वेळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे बंदोबस्तावर असलेल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंढरपूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com