जाहिरात

हिट अँड रनचा आणखी एक बळी; वरळीत BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू

पुणे पोर्शे हिट अँड रन आणि कावेरी नाखवा यांची प्रकरणं ताजी असताना वरळीत एका BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृ्त्यू झाला आहे.

हिट अँड रनचा आणखी एक बळी; वरळीत BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू
मुंबई:

पुणे पोर्शे हिट अँड रन आणि कावेरी नाखवा यांची प्रकरणं ताजी असताना वरळीत एका BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृ्त्यू झाला आहे. विनोद लाड (28) असं या तरूणाचं नाव आहे. BMW ची धडक इतक्या जोरात होती की विनोदला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं, येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही  BMW कार ठाण्यातील व्यावसायिकाची आहे. अपघातावेळी चालक गाडी  चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मूळचा मालवण येथील रहिवासी असलेल्या विनोद ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता. तो ए.जी. खान अब्दुल गफारखान मार्गावरून घरी चालला होता. 20 जुलै रोजी कामावरून घरी परतत असताना त्याच्या दुचाकीचा BMW कारने पाठीमागून धडक दिली. तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धडक देणारी कार तिथून पळून गेली, परंतू मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने थांबवून त्याला नायर रुग्णालयात नेले. येथे विनोदवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आठ दिवस विनोद मृत्यूशी झुंज देत होता. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली.

नक्की वाचा - धावत्या स्कुटीवर कोसळलं मोठं झाड; आई-वडिलांसमोर मुलाची तडफड, उपचारदरम्यान मृत्यू

कारचा मालक हा ठाण्यातील अत्तर व्यावसायिक असल्याची माहिती आहे. वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी ते वरळीमध्ये आले होते. दरम्यान अपघात घडला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर मोटरगाडी चालवत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
ग्राहकांच्या 'त्या' यादीवरुन वाधवान यांची IBBI कडे धाव; ग्राहकांनी मात्र फेटाळले सर्व दावे
हिट अँड रनचा आणखी एक बळी; वरळीत BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू
Citizens protest in the case of sexual abuse of school children in Badlapur
Next Article
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकर संतप्त; शाळेच्या गेटवर पालकांसह नागरिकांना रोखलं