जाहिरात

Rohit Pawar: बारामतीमध्येही रोहित पवारांची निराशा! दीड तास चर्चा, पोलिसांवर कागदपत्रे फेकली, नेमकं काय घडलं?

तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतरही एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले. 

Rohit Pawar: बारामतीमध्येही रोहित पवारांची निराशा! दीड तास चर्चा, पोलिसांवर कागदपत्रे फेकली, नेमकं काय घडलं?

देवा राखुंडे, बारामती: 

Rohit Pawar PC Baramati: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अपघातासंदर्भात डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार वकिलांची फौज घेऊन बारामतीत पोलीस ठाण्यात दाखल झाले, त्यांच्यासोबत युगेंद्र पवारही उपस्थित होते. तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतरही एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले. 

काय म्हणाले रोहित पवार? 

"दोन दिवसांपूर्वी डीजीसीए एक रिपोर्ट आलेला सर्वांनी पाहिला. हा २४ फेब्रुवारीचा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टनंतर काल मी सर्वपक्षीय आमदार मुंबईमधील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तिथे गेलो. त्याठिकाणी अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत जो रिपोर्ट दिला आहे. त्यामध्ये व्हीएसआर कंपनीकडून निष्काळजीपणा झाल्याचा थेट आरोप आहे. त्यावरुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केली होती," असं रोहित पवार यांनी सांगितले. 

Unseasonal Rain: अवकाळीने झोडपलं, बळीराजाला अडवलं, मराठवाड्यात 5 जिल्ह्यांना फटका, तब्बल 19 हजार हेक्टरवर...

तसेच  "मी मुंबईला एफआयआर करु शकत होतो तो एफआयआर ट्रान्सफर करता आला असता, मात्र तो त्यांनी स्वीकारला नाही. सेक्शन १७३ अंतर्गत या देशातील कोणत्याही नागरिकाला एफआयआर करण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारी प्रकरणात असा निकाल दिला आहे. तुमच्यापैकी कोणीही एफआयआर केला तरी स्विकारला पाहिजे. याआधी ३०-३१ लाही आपण केस करु शकलो असतो, कारण सखोल माहिती येऊ द्या," अशी आमची भूमिका होती. 

पुढे बोलताना रोहित पवार सांगितले की, "जर व्हीएसआरची विमाने उडण्यास बंदी घातली आहे तर अजित पवारांना खराब विमान का दिले गेले? ते चुकून दिले गेले की मुद्दाम दिले गेले? अजित पवार यांच्या विमानचे कंडीशन चांगले असल्याचे कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितले? याबाबतचा तपास व्हावा, यासाठी आम्ही एफआयआर करत आहोत. ऍरो नावाच्या कंपनीवर एफआयआर करा असं आम्ही सांगितले. विमान उड्डाण घेण्यास योग्य हवामान आहे असं कोणी सांगितले त्यांची चौकशी झाली पाहिजे. 

"गेले दोन तास चर्चा केल्यानंतरही असं करता येत नाही, असं पोलिसांचे म्हणणे आहे, कारण अपघाताचा गुन्हा नोंद आहे. दादांचे आत्तापर्यंत अपघात झाला आहे, एवढीच नोंद आहे. मात्र यामागे घातपातचा संशय किंवा गुन्हेगारी कृत्य आहे त्याबाबतच्या तपासाचे काय होणार आहे? त्याबाबत कुठेही गुन्हे घेतले जात नाहीत. कालही अधिकाऱ्यांवर दबाव होता, तसाच दबाव बारामतीमधील पोलिसांवरही जाणवत आहे. इथे १०० वकिलांची फौज आहे, आम्ही आणखी काहीवेळ थांबूून निर्णयाची वाट पाहू, असं रोहित पवार म्हणाले. 

Ajit Pawar Plane Crash: रोहित पवारांच्या लढ्याला मोठं यश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

एफआयआर का नको आहे? एफआयर घेण्यास टाळाटाळ का होत आहे? सुशांत सिंग राजपुतचा मुद्दा किती तापवला गेला. तो तर महाराष्ट्राचाही नव्हता. अजित पवार यांची दखल घेऊ नये असे शासन सांगत आहे का? आम्ही जो एफआयआर दाखल करत आहोत तो चुकीचा असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, असंही रोहित पवार म्हणाले. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com